28 February 2021

News Flash

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने ट्रोलिंगला कंटाळून घेतला ‘हा’ निर्णय

अंकिताच्या बॉयफ्रेंडचे नाव विकी जैन आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यामुळे त्याच्या निधनानंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. अनेक कलाकारांनी घराणेशाही या वादावर वक्तव्य केले. त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी चित्रपट निर्माता करण जोहर आणि आलिया भट्टवर निशाणा साधला. तसेच नेटकऱ्यांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडला देखील ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याने या ट्रोलिंगला कंटाळून मोठे पाऊल उचलले आहे.

अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विकी जैन एक उद्योगपती आहे. तो फारसा सोशल मीडियावर सक्रिय देखील नसतो. पण सुशांतच्या निधनानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधल्यामुळे त्याने त्याचा कमेंट बॉक्स सर्वांसाठी बंद केला आहे. त्याने लिमिटेड कमेंट हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे आता तो फॉलो करत असलेल्या व्यक्ती केवळ त्याच्या पोस्टवर कमेंट करु शकतात. ट्रोलिंगला कंटाळून त्याने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

इन्स्टाग्रामवर अनेकांनी विकीला अंकितासोबत ब्रेकअप करण्यास सांगितले होते. तर एका यूजरने ‘तू अंकिता आणि सुशांतच्या मध्ये आला अशील’ असे म्हणत सुनावले आहे. काहींनी विकीला अंकिताची काळजी घेण्यासही सांगितले आहे. ‘सुशांतच्या जाण्याने अंकिताला धक्का बसला आहे. तू तिची काळजी घे’ असे एका यूजरने म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे जवळपास पाच वर्षे रिलेशनमध्ये होते. त्यांनी पवित्र-रिश्ता या छोट्या पडद्यावरील एकता कपूरच्या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केले होते. त्यांची ओळख देखील मालिकेच्या सेटवर झाली होती. २०१६मध्ये अंकिता आणि सुशांतचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अंकिता उद्योगपती विकी जैनच्या प्रेमात पडली. ती बऱ्याच वेळा विकीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुशांत गेल्या काही दिवसांपासूव नैराश्यामध्ये होता आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 11:05 am

Web Title: ankita lokhandes boyfriend vicky jain limits comments on instagram avb 95
Next Stories
1 Video : विदेशी चिमुकल्यांमध्ये बॉलिवूडची क्रेझ; लंडनच्या रस्त्यावर नोरासोबत धरला ताल
2 Video : जेव्हा भर कार्यक्रमात मीराने केली करण जोहरची बोलती बंद
3 ‘हंसना आसान है, हंसाना बहुत मुश्किल..’; जगदीप यांच्या आठवणीत सेलिब्रिटी भावूक
Just Now!
X