21 January 2021

News Flash

शेवंताचे टीव्हीवर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

या मालिकेत ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्र कायम चर्चेत होतं. पण मालिकेतील शेवंता या पात्राच्या विशेष चर्चा रंगल्या होत्या. ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शेवंता हे पात्र साकारणारी अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असते. पण आता अपूर्वाची नवी मालिका येणार असून नुकताच तिचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

या मालिकेचे नाव आहे ‘तुझं माझं जमतय.’ ही एक विनोदी मालिका आहे. या मालिकेत अपूर्वा पम्मी या वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. तसेच तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता राकेश विचारे आणि अभिनेत्री आसावरी भरती भानुदास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा भन्नाट प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

अपूर्वाला पुन्हा एका नव्या मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘तुझं माझं जमतय’ ही अपूर्वाची मालिका झी यूवा वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. मालिकेत पम्मी ही शुभांकर आणि अश्विनीला तिच्या तालावर नाचवणार की काय हे पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 5:14 pm

Web Title: apurva nemlekar aka shevanta upcoming serial promo tujha majha jamtay avb 95
Next Stories
1 चर्चेत असणाऱ्या लग्नाच्या फोटोंवर अनुप जलोटा यांचे स्पष्टीकरण, ‘फोटो खरा आहे पण…’
2 ‘पीएम मोदी’ पुन्हा चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित, निर्माता संदीप सिंहने केली घोषणा
3 म्हणून अली फजलवर होत आहे बहिष्कार टाकण्याची मागणी ?
Just Now!
X