News Flash

‘दिल बेचारा’ रिलिजच्या आधी होणार वर्चुअल म्यूझिक कॉन्सर्ट

या कॉन्सर्टद्वारे ए आर रहमान आणि म्यूझिक कंपोजर सुशांतला श्रद्धांजली वाहणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. पण सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आलेले नाही. सुशांतला मोठ्या पडद्यावर शेवटचे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी म्यूझिक कंपोझर आणि गायक ए आर रेहमान सुशांतला एका गाण्यातून श्रद्धांजली वाहणार आहेत.

दिल बेचारा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी गायक ए आर रहमान, श्रेया घोशाल, सुनिधी चौहान, अमिताभ भट्टाचार्या, मोहित चौहान, अरजीत सिंह, हृदय गट्टानी आणि जोनिता गांधी अभिनेता सुशांत सिंह राजपूतला वर्चुअल म्यूझिक कॉन्सर्टद्वारे श्रद्धांजली वाहणार आहेत. या संदर्भात मुकेश छाब्राने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ए आर रहमना ‘दिल बेचारा’ चित्रपटातील टायटल ट्रॅक गाताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

tomorrow at 12 noon. Don’t forget

A post shared by Mukesh Chhabra CSA (@castingchhabra) on

मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री संजना सांघी ही सुशांतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजना या चित्रपटाच्या निमित्ताने कलाविश्वात पदार्पण करणार आहे. तसेच अभिनेता सैफ अली खानदेखील या चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे जुलै २०१८मध्ये चित्रीकरण सुरु झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:05 pm

Web Title: ar rahman dil bechara virtual musical concert for tribute to sushant singh rajput avb 95
Next Stories
1 दोन रुपयांचं वर्तमानपत्र देतय फ्री मास्क; ए. आर. रेहमान यांनी केलं कौतुक
2 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार बाबासाहेबांचा राजगृह प्रवेश
3 ‘एक बायको सांभाळली जात नाही आणि..’, असे ट्रोल करणाऱ्याला अनुरागने दिले उत्तर
Just Now!
X