वर्षभरापूर्वी घेतलेलं एक कोटींचं कर्ज फेडण्यास अपयशी ठरलेल्या अभिनेता अर्जुन रामपालविरोधात एका कंपनीनं खटला दाखल केला आहे. तीन महिन्यात व्याजासकट कर्जाची परतफेड करतो असं सांगून अर्जुननं २०१८ मध्ये एक कोटींचं कर्ज घेतलं होतं मात्र मुदत उलटून गेल्यानंतरही अर्जुननं कर्जफेड न केल्यानं कंपनीनं आता न्यायालयात धाव घेतली आहे.

अर्जुननं एका मनोरंजन कंपनीकडून एक कोटींचं कर्ज घेतलं होतं. ९० दिवसांत १२ टक्के व्याजासहित  कर्जफेड करण्याची तयारी अर्जुननं दर्शवली होती. मात्र कर्जफेडण्याची मुदत संपून बरेच दिवस उलटले तरी अर्जुननं कर्ज फेडलं नाही असा आरोप कंपनीचा आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये अर्जुननं कंपनीला १ कोटींचा चेक दिला होता मात्र तो बाऊन्स झाला असा कंपनीचा आरोप आहे.

कंपनीनं नंतर अर्जुनला कायदेशीर नोटीसही पाठवली होती. ज्यात अर्जुनला कर्जफेडीसाठी आणखी १४ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र नोटीस पाठवूनही अर्जुननं उत्तर दिलं नाही असा कंपनीचा आरोप आहे. मात्र कंपनीने अर्जुनचे आरोप फेटाळून लावले आहेत.