News Flash

क्रिकेटपटूबरोबर अफेर?; चर्चांवरुन संतापली सुनील शेट्टीची मुलगी, म्हणाली…

अथिया शेट्टी आणि भारतीय संघातील सलामीवीराचे अफेर असल्याची चर्चा

बॉलिवूड आणि क्रिकेट कनेक्शन काही नवे नाही, सध्या बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुल यांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा सुरु आहे. एका कार्यक्रमात या दोघांना एकत्र पाहिले गेले होते, त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान फॅशन डिझायनर विक्रम फडणीस याने इस्टाग्रामच्या माध्यमातून अथियाला चिडवण्यास सुरुवात केल्यामुळे या चर्चांना आणखीन उधान आले होते. परंतु अथियाने देखील तितक्याच कुशलतेने विक्रमला प्रत्युत्तर देऊन त्याचे तोंड बंद केले. अथियाच्या या उत्तराची चाहत्यांकडून प्रशंसा केली जात आहे.

आथियाने काही दिवसांपूर्वी “आपल्या आयुष्यात वेळेवर विश्वास ठेवा.” असे लिहिलेला एक फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केला होता. या पोस्टवर विक्रम फडणीसने “तुम इन दिनों काफी उत्साहित नजर आ रही हो. चलो केएल चलें??? कुआला-लंपुर.” अशी कॉमेंट केली होती. तसेच ही कॉमेंट त्याने के राहूलला देखील टॅग केली होती. या प्रकारावर संतापलेल्या अथियाने “आता तुलाच ब्लॉक करण्याची वेळ आली आहे” अशी कॉमेंट करुन विक्रमच्या पोस्टवर प्रत्युत्तर दिले. अथिया व विक्रम यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक चकमकीतील प्रत्येक पोस्ट के राहूलच्या टॅग केली जात आहे. मात्र त्याने यावर अद्याप आपली कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

अथिया शेट्टीने हीरो या चित्रपटातून अभिनयसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी तिला दादा साहेब फाळके या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर ती मुबारकां या चित्रपटात झळकली होती. आता चाहते तिच्या मोतीचूर चकनाचूर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 4:41 pm

Web Title: athiya shetty k l rahul vikram phadnis mppg 94
Next Stories
1 रानू मंडल यांच्याबद्दल भाजपाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
2 नाही! मी बिग बींची कॉपी केलेली नाही.. – संजय दत्त
3 दक्षिणेचा नवा सुपरस्टार प्रभास, ‘साहो’साठी २४ तास सिनेमागृह राहणार खुले ?
Just Now!
X