13 August 2020

News Flash

विदेशी वारे : ‘अ‍ॅव्हेंजर्स’ आणि ‘अवतार’ चीनमध्ये परतणार !

चीन आणि करोना हे दोन्ही शब्द सध्या जगभरातील लोकांची धडकी भरवण्यासाठी पुरेसे आहेत

संग्रहित छायाचित्र

रेश्मा राईकवार

चीन आणि करोना हे दोन्ही शब्द सध्या जगभरातील लोकांची धडकी भरवण्यासाठी पुरेसे आहेत. पण चीनपुरते म्हणायचे तर एका महाभयानक संकटातून पार पडल्यानंतर आता कु ठे करोना या शब्दामागचा थरार त्यांच्यापुरता का होईना कमी झाला आहे. त्याचे परिणाम असे सहजी पुसले जाणारे नसले तरी आता कु ठे तिथले जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहते आहे. कित्येक दिवसांच्या बंदीवासानंतर बाहेर पडलेल्या चीनमधील लोकांसाठी मनोरंजनाचे नवनवीन पर्याय देण्यासाठी अनेकांनी कं बर कसली आहेत. आता तिथली चित्रपटगृहेही सुरू झालेली असल्याने माव्‍‌र्हलची अ‍ॅव्हेंजर्स चित्रपट मालिका लवकरच तिथे पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. संकटातून बाहेर पडल्यानंतर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी एकाचवेळी काहीतरी त्यांना आनंद देईल, त्यातून बाहेर काढेल असे मनोरंजनाचे पर्याय हवे असतात. त्यामुळे नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा जे गाजलेले चित्रपट आहेत ते पहिल्यांदा तिथे प्रदर्शित होणार आहेत. माव्‍‌र्हलपटांबरोबरच काही लोकप्रिय, सुपरहिट चीनी चित्रपटही पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत.  ‘वोल्फ वॉरिअर २’, ‘वाँडरिंग अर्थ’ आणि ‘वोल्फ टोटेम’ हे तीन चीनी हिट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय ‘हॅरी पॉटर’, ‘इंटरस्टेलर’ आणि ‘इंटरसेप्शन’ हे हॉलिवूडपटही यावेळी चीनमध्ये प्रदर्शित होणार आहेत. जेम्स कॅ मेरून दिग्दर्शित ब्लॉकबस्टर ‘अवतार’ हा चित्रपटही चिनी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या पाचशेच चित्रपटगृहांमधून हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे एके काळी तिकीटबारी गाजवणाऱ्या या चित्रपटांमध्ये आता पुन्हा एकदा रस्सीखेच होणार आहे. यात पुन्हा कोणता चित्रपट सर्वाधिक प्रेक्षकपसंती मिळवतो हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

‘थॉर २’ आणि ‘वंडर वुमन’ची दिग्दर्शिका पॅटी

व्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ आणि ‘डीसी’ या दोघांमधील वर्षांनुवर्षांचे युध्द त्यांच्या चाहत्यांनाही माहिती आहे. पण जे दिग्दर्शक या दोन्ही कं पन्यांशी जोडले जातात त्यांचीही अनेकदा इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती होते. अशाच काहीशा परिस्थितीचा सामना ‘वंडर वुमन’ची दिग्दर्शिका पॅटी जेकिन्सलाही करावा लागला होता. ‘वंडर वुमन’च्या यशानंतर पॅटीचा चांगला बोलबाला झाला. मात्र त्याहीआधी पॅटीला माव्‍‌र्हलने ‘थॉर २’चे दिग्दर्शन करण्याचा प्रस्ताव दिला होता, त्यावेळी पॅटीने तो नाकारला. खरंतर कु ठलंही मोठं नाव नसताना मला माव्‍‌र्हलने त्यावेळी ‘थॉर २’च्या दिग्दर्शनासाठी निवडले होते. मात्र त्यावेळी ते ज्या पध्दतीच्या पटकथेवर चित्रपट करायचे ठरवत होते, त्यावर उत्तम चित्रपट मी देऊ शके न, असं मला वाटत नव्हतं. तो चित्रपट फसला असता तर सगळा दोष माझ्यावर आला असता. बघा.. एका महिला दिग्दर्शकाने हा चित्रपट के ला आणि तो फसला असेही म्हटले गेले असते. या सगळयाची माझी तयारी नव्हती, असे पॅटीने एका मुलाखतीत स्पष्ट के ले.  पॅटीने त्यावेळी त्या चित्रपटावर पाणी सोडले आणि हा चित्रपट दिग्दर्शक अ‍ॅलन टेलर याच्याकडे गेला होता. आणि पॅटीच्या अंदाजाप्रमाणे अ‍ॅलन यांनाही त्या चित्रपटासाठी हवे तसे यश मिळाले नाही. खुद्द अ‍ॅलननेही एका मुलाखतीत माव्‍‌र्हलबरोबरचा हा अनुभव फसल्याचे मान्य के ले होते. त्यानंतर थॉरच्या तिसऱ्या सिक्वलची जबाबदारी दिग्दर्शक ताईका वाईतिती यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र या अनुभवानंतरही पॅटी माव्‍‌र्हलचे कौतूकच करते. तिच्या मते मुळात माव्‍‌र्हलने पहिल्यांदा तिलाच संधी देऊ के ली होती. त्यांनी तिच्यावर विश्वासही टाकला होता. इतकं च नाही तर त्यांनी दिग्दर्शक वाईतितीची निवड के ली याबद्दलही तिने आनंद व्यक्त के ला. ‘थॉर ३’साठी त्यांनी ताईका वाईतितीची निवड करून योग्यच निर्णय घेतला. ताईकाने या चित्रपटाला नवा श्वास दिला. मला स्वत:ला ताईकाने दिग्दर्शित के लेला ‘थॉर : रॅग्नारॉक’ खूप आवडला होता, असेही पॅटीने सांगितले. अर्थात, पॅटीचा हा निर्णय चुकला नाही. तिच्याकडे डीसीचा ‘वंडर वुमन’ चित्रपट आला, हा चित्रपट आपल्यालाही मनापासून करावासा वाटल्याचे तिने सांगितले. या चित्रपटाला तिकीटबारीवर चांगले यश मिळाले. आता ‘वंडर वुमन’चा दुसरा भाग ‘वंडर वुमन १९८४’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. सध्या तरी करोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:51 am

Web Title: avengers and avatar will return to china abn 97
Next Stories
1 पाहा नेटके : ‘शी’तली ‘ती’!
2 चित्र चाहुल : जुन्या प्रकाशाचे तेज..
3 इकडे आड, तिकडे विहीर
Just Now!
X