News Flash

‘बाहुबली’मधल्या या अभिनेत्याला मिळाले हॉलिवूडचे तिकीट?

हॉलिवूड चित्रपट निर्मात्यासोबत या अभिनेत्याची चर्चा सुरू आहे.

'बाहुबली २'

‘बाहुबली’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या अभिनेता राणा डग्गुबती म्हणजेच चित्रपटातील ‘भल्लालदेव’ने खलनायकी भूमिकेतूनही प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. ‘बाहुबली’च्या आधीही त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. टॉलिवूड आणि बॉलिवूडनंतर आता राणा हॉलिवूडसाठी सज्ज झाला आहे.

एका हॉलिवूड चित्रपट निर्मात्यासोबत राणाशी चर्चा सुरू असून त्याच्या चित्रपटात तो काम करण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. ‘काही हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी राणाची भेट घेतली असून एखादी स्क्रिप्ट आणि भूमिका आवडल्यास तो नक्कीच विचार करेल,’ अशी माहिती राणाच्या जवळच्या व्यक्तीने एका वेब साइटला दिली आहे.

वाचा : ‘उरी’ चित्रपटातील How’s The Josh डायलॉगबाबत विकी कौशल म्हणतो..

सध्या राणा त्याच्या आगामी ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर कदाचित तो हॉलिवूड चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याची बहुतांश शूटिंग मुंबईत होणार आहे. त्याशिवाय तो आगामी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातही झळकणार आहे.

चित्रपटसृष्टीतील आठ वर्षांच्या कारकिर्दीत राणाने विविध भूमिका साकारल्या. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली द बिगनिंग’ आणि त्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘बाहुबली द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 3:19 pm

Web Title: baahubali star rana daggubati goes to hollywood
Next Stories
1 ‘उरी’ चित्रपटातील How’s The Josh डायलॉगबाबत विकी कौशल म्हणतो..
2 ‘उरी’चा जोश कायम; २०० कोटी कमाईकडे कूच
3 ‘दबंग ३’मध्ये चुलबूल पांडेसोबत झळकणार करिना कपूर
Just Now!
X