News Flash

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’साठी ‘बधाई हो’ची लोकप्रिय टीम एकत्र

बधाई हो या चित्रपटातील कलाकरांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती.

बधाई हो टीम

‘शुभ मंगल सावधान’ हा २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अनेकांची मने जिंकली होती. या चित्रपटात अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकले होत. आता या चित्रपटाचा सिक्वल येणार असून ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ असे त्याचे नाव असणार आहे.  या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑगस्ट महिन्यात सुरूवात करण्यात येणार असून चित्रपट २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान या चित्रपटात अभिनेता आयुषमानसह कोणते कलाकार दिसणार यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. आता या चित्रपटात गेल्या वर्षी सुपरहिट ठरलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातील गजराज राव आणि नीना गुप्ता आयुषमानसह झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच असणार आहे. ‘बधाई हो’ या चित्रपटात नीना गुप्ता आणि गजराज यांनी आयुषमानच्या पालकांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादूच केली होती. आता ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मध्ये ते कोणती भूमिका साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

नीना आणि गजराज यांना चित्रपटाची कथा आवडली असून त्यांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात देखील हे दोघे पती पत्नीच्या परंतु एकदम वेगळ्या अंदाज दिसणार असल्याचे कळत आहे.

आयुषमानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय करणार आहेत. या चित्रपटात एका समलैंगिक युवाची कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच चित्रपटात LGBTQ आणि कलम ३७७ या विषयी सांगण्यात येणार आहे. ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाबद्दल बोलताना आयुषमान म्हणतो की चित्रपटाची कथा सर्वांच्या मनाला भावणारी आहे. तसेच हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद देखील असणार आहे. चित्रपटाची कथा ही एक कॉमेडी अंदाजात असणार असल्याचेही आयुषमान म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 12:43 pm

Web Title: badhai ho star going to play role in subha mangala jyada savdhan avb 95
Next Stories
1 इंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक
2 Video : ‘काहे दिया परदेस’ची सायली घेणार प्रेमाचा ‘यू टर्न’
3 VIDEO: विशेष संदेशासह सलमानने पूर्ण केलं ‘बॉटल कॅप चॅलेंज’
Just Now!
X