कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच सुरु झालेली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. पहिल्याच आठवड्यापासून मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच संत बाळूमामा यांच जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. मालिकेमध्ये संत बाळूमामा यांची भूमिका साकारणारा समर्थ, सुंदरा (बाळूमामांची आई) अंकिता, मयप्पा (बाळूमामाचे वडील) तसेच पंच – पंच बाई, देवऋषी या कलाकारांच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

कलाकार, कथा, अभिनय, शीर्षक गीत या सर्वांनाच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. शीर्षक गीतामध्ये जवळपास ७० कलाकारांचा समावेश आहे. तसेच संत बाळूमामा यांची भूमिका साकारणाऱ्या समर्थसाठी खास हैद्राबादहून फेटा मागविण्यात आला होता. या मालिकेच्या निमित्ताने संत बाळूमामांचे अनेक पैलू त्यांच्या भक्तांना पुन्हा एकदा बघण्याची संधी मिळणार आहे. मालिकेमध्ये पुढच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक घडामोडी, घटना बघायला मिळणार आहे.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

वाचा : नातीसोबत बिग बी लवकरच खेळणार ‘केबीसी’

संत बाळूमामा आणि त्यांची आई सुंदरा या दोघांमधील खूप सुंदर आणि अतूट नातं मालिकेमध्ये अत्यंत छानप्रकारे दाखविण्यात येत आहे. त्यांच्या आईंचा त्यांच्यावर असलेला विश्वास, प्रेम तसेच त्यांची आईवर असलेली निष्ठा अतिशय अप्रतिमरीत्या प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत आहे. बाळूमामांचे हजारो अनुयायी त्यांच्यापुढे आजही नतमस्तक होतात. बाळूमामांच्या मेंढ्याचे कळप अतिशय शुभ मानले जातात. त्यांच्या देवस्थानी त्यांचे अनेक भक्त त्यांच्या समस्यांचे निरसन करण्याकरता जातात. हजारो लोकांना आधार देणाऱ्या असाधारण माणसाचे म्हणजे संत बाळूमामांचे चरित्र या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळत आहे.