News Flash

जवळच्या व्यक्तीला गमावूनही श्रेया बुगडे करतीये प्रेक्षकांचं मनोरंजन

श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर

भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला आहे. ऑक्सिजन, औषधे यांच्या कमरतेमुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या माणसांना गमवाले. पण हेच कलाकार स्वत:च्या आयुष्यातील दु:ख विसरुन चेहऱ्यावर हास्य ठेवत प्रेक्षकांचे मनोरंजन करु लागले. असेच काहीसे अभिनेत्री श्रेया बुगडेसोबत घडले.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून श्रेया प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या कॉमेडी क्वीनवर दु:खाचा डोंगर कोसळा आहे. या कार्यक्रमातील एका भागामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी श्रेया बुगडेशी गप्पा मारत होता. दरम्यान त्याने श्रेया कठीण काळातून जात असल्याचे सांगितले आहे. करोनामुळे तिच्या दोन मावशींचे निधन झाले.

आणखी वाचा : ‘कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री आर्थिक संकटात; २०११ पासून ‘या’ आजाराने आहे त्रस्त

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth (@shreyabugde)

या विषयी कार्यक्रमात बोलताना श्रेया म्हणाली, ‘माझ्या दोन्ही मावशींना करोना झाला होता. जेव्हा करोनाची पहिली लाट आली तेव्हा आम्ही खबरदारी घेतली होती. पण दुसरी लाट थेट आमच्या घरावर येऊन धडकली. या लाटेमुळे अवघ्या २४ तासांमध्ये माझ्या दोन्ही मावशींना आमच्यापासून हिरावून नेलं. मी त्या दोघींची खूप लाडकी होते. त्या दोघी आम्हाला अचानक सोडून जातील असा स्वप्नातही विचार केला नव्हता. तो खूप मोठा धक्का होता.’

मावशींविषयी बोलताना श्रेयाला अश्रू अनावर झाले होते. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच्या डोळ्यात पाणी आले. पण खासगी आयुष्यातील दु:ख विसरुन श्रेया चेहऱ्यावर हास्य आणून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे हे पाहून सर्वांनी तिचे कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 11:12 am

Web Title: because of pandemic chala hava yeu dya fame shreya bugade lost her 2 close person avb 95
Next Stories
1 मुलीच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या मुलांना सोडले? म्हणणाऱ्यांना माहीने दिले सडेतोड उत्तर
2 “मेकर्सना गुणांपेक्षा गरिबी दाखवण्यात जास्त इंट्रेस्ट”; इंडियन आयडल अभिजीत सावंतचा खुलासा
3 Birthday Special : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव माहितीये का?
Just Now!
X