News Flash

सेम टू सेम! भाऊ कदमसोबत असलेल्या ‘या’ व्यक्तीला ओळखलंत का?

भाऊने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दु:ख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा अभिनेता भालचंद्र कदम अर्थात लाडक्या भाऊ कदमचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या फोटोमध्ये भाऊसोबत आणखी एक व्यक्ती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या दिसण्यात बरंच साम्य आहे. भाऊ कदमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे.

फोटोमध्ये हुबेहूब भाऊसारखा दिसणारा हा व्यक्ती त्याचा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त भाऊने हा फोटो पोस्ट करत त्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोवर अनेकांनी ‘जुडवा’, ‘सेम-टू-सेम’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे भाऊला आपल्या कुटुंबाला फारसा वेळ द्यायला मिळत नाही. पण शूटिंग नसताना तो कुटुंबीयांसोबत निवांत क्षण आवर्जून घालवतो. भाऊ व ममता यांच्या सुखी संसारात त्यांच्या तीन मुलीही आहेत. मृण्मयी, संचिती आणि समृद्धी अशी भाऊच्या लाडक्या लेकींची नावं आहेत. इतकं यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदममधील साधेपणा आजही कायम आहे. त्यामुळेच साधं राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे भाऊ कदम रसिकांचा लाडका बनला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 11:06 am

Web Title: bhau kadam and his brother photo viral on social media ssv 92
Next Stories
1 VIDEO: ‘नक्की शेण खातंय कोण?’; राजकारण्यांवर भरत जाधव संतापला
2 मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर मागील १० वर्षांपासून गायब आहे ही अभिनेत्री
3 देवीची नऊ रुपं साकारण्यासाठी तेजस्विनीला लागला इतका कालावधी
Just Now!
X