News Flash

Video : ‘नशीबवान’ भाऊ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं

नशीबवान

आयुष्यात कोणतीही चांगली किंवा वाईट घटना घडली की आपण थेट नशीबाला जबाबदार धरत असतो. मुळात, आपले नशीब हे आपल्या हातात असते. आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतो, मात्र नाव नशिबाचं नाव पुढे केले जाते. नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारित अभिनेता भाऊ कदम यांचा आगामी नशीबवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं असून या मोशन पोस्टवर भाऊ कदम एक स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्याच्या हातात त्याचा साथीदार म्हणजे साफ सफाई करणारा झाडूसुद्धा तेवढ्याच दिमाखात चमकत असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारित असलेला ‘नशीबवान’ हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांची देखील मुख्य भूमिका आहे. ‘नशीबवान’ या सिनेमाचे अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 5:03 pm

Web Title: bhau kadam new marathi movie nashibvaan
Next Stories
1 Kedarnath Trailer : ये पूरे केदारनाथ की बात है
2 Video : करिनाच्या ‘या’ भावाशी सारा खानला करायचं लग्न ?
3 Video : लग्नासाठी आतूर रणवीर विमानतळावर वाजवत होता ‘हे’ गाणं
Just Now!
X