13 December 2018

News Flash

भाऊ कदमने सुरू केलं स्ट्रगलर्सचं कॅन्टीन

संघर्ष कुणालाही चुकलेला नाही.

भाऊ कदम

कितीही शिक्षण घेतलं तरी संघर्ष कुणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाला काम मिळवण्यासाठी धडपड करावीच लागते. अशाच काही स्ट्रगलर्ससाठी विनोदवीर भाऊ कदमने स्टगलर्स कॅन्टीन सुरू केलं आहे. या कॅन्टीनमध्ये तो स्टगलर्सचं मार्गदर्शन करतोय. अर्थात, हे काही खरंखुरं कॅन्टीन नाही, तर ‘जगा वेगळी अंतयात्रा’ या चित्रपटात भाऊ हे कॅन्टीन चालवताना दिसणार आहे.

रुपेरी पडद्यावर भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी पुन्हा एकदा भाऊ कदम सज्ज झाला आहे. या चित्रपटात त्याच्याकडे आलेल्या चार सुशिक्षित बेकार तरूणांना तो अंतयात्रा काढण्याचा सल्ला देतो. ते तरूण काम मिळवण्यासाठी तो सल्ला मानून अंतयात्रा काढतात आणि काय मजा होते ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

वाचा : ‘जान्हवीची श्रीदेवी यांच्याशी तुलना नकोच’

डॉ. नितीन श्याम तोष्णीवाल यांच्या अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा.ली. या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमोल लहांडे यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. भाऊ कदम यांच्यासह सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे या नव्या दमाचे अभिनेते या चित्रपटात दिसणार आहेत. ‘जगा वेगळी अंतयात्रा’ हा चित्रपट २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on March 13, 2018 3:50 pm

Web Title: bhau kadam runs strugglers canteen in jagavegli antayatra marathi movie