शशांक घोष दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तस्लानिया या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारली असून आज पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांना भूरळ घातल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे ‘भावेश जोशी सुपरहिरो’ हा चित्रपटाही प्रदर्शित झाला. यावेळी चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. या चित्रपटामध्ये हर्षवर्धन कपूर याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरल्याचे यावेळी पहायला मिळाले.
Here’s finally cool vigilante film, n this one is certainly a tear jerker.@HarshKapoor_ u nailed it. A big shoutout to @priyanshu29 @Ashishsverma .Congratulations #VikramadityaMotwane and team! #BhaveshJoshi
— Patralekhaa (@Patralekhaa9) June 1, 2018
हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून अनेकांनी या चित्रपटाला आणि त्यातील कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काही प्रेक्षक तर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच या चित्रपटाचे कथानक आणि ते मांडण्याची पद्धतही प्रेक्षकांना विशेष भावल्याचे दिसून आले.
Big hug and lots of luck superhero… @HarshKapoor_ #BhaveshJoshi #VikramadityaMotwane
— Aditi Rao Hydari (@aditiraohydari) June 1, 2018
दरम्यान, अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने देखील ‘भावेश जोशी..’ च्या संपूर्ण टिमला शुभेच्छा दिल्या आहेत. विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘भावेश जोशी सुपरहिरो’ या चित्रपटामध्ये सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर हा झळकला आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी दोन्ही बहीण-भावाचे चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र यात दोघांनाही समसमान यश मिळाल्याचे पहायला मिळाले. या चित्रपटामध्ये प्रियांशु पेन्युली, आशीष वर्मा, निशिकांत कामत या कलाकांची वर्णी लागली असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरल्याचे दिसून आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 1, 2018 7:59 pm