News Flash

‘भेद’च्या माध्यमातून अनुभवा थरारक प्रेमकथा

येत्या १५ फेब्रुवारीला होणार चित्रपट प्रदर्शित

जात, धर्म, पैसा, संपत्ती प्रेमाच्या आड येत नाही. प्रेमाच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी प्रेम यशस्वी होतेच. अशीच एक जगावेगळी पुनर्जन्माची आणि प्रेमाच्या ध्यासाची खिळवून टाकणारी गोष्ट सांगणारा ‘भेद’ हा संगीतमय चित्रपट येत्या १५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सुचिता जाचक यांच्या ग्रीन चिली मुव्ही इंटरनॅशनल निर्मित ‘भेद’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद शिरभाते यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या मातीतला अस्सलपणा दाखवणारी दोन पिढ्यांमध्ये रंगणारी ही प्रेमाची गोष्ट, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. शाम-राधा, मनाली-भिवा ही पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करतील असा विश्वास निर्मात्यांना आहे.

ही प्रेमाची गोष्ट संगीतमय असून चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. ही सहा गाणी लाईव्ह ऑन म्युझिक या मराठी युट्यूब चॅनलवर दिसणार आहेत त्यातले‘कोण शिट्या वाजवतो’ हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले असून लोकप्रिय हिंदी अभिनेत्री पूनम पांडे या गाण्याच्या निमित्ताने मराठीत पदार्पण करते आहे. पूनम पांडे आपल्या या पदार्पणाबद्दल विशेष उत्सुक आहे. या चित्रपटात अजित गाडे, श्लेषा मिश्रा, अभिषेक चौहान आणि डॉ.राजेश बक्षी मुख्य भूमिकेत आहेत. संगीतमय मनोरंजन करणारा हा थरारक प्रेमकथा असलेला ‘भेद’सध्याच्या मराठी चित्रपटात वेगळा ठरेल असे चित्रपटाच्या टीमचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 6:49 pm

Web Title: bhed movie horror romantic will be release on 15th february
Next Stories
1 Happy Birthday Preity Zinta: हे पाच अविस्मरणीय चित्रपट
2 रणबीरच्या ‘अमृतभेटी’विषयी बिग बी म्हणतात..
3 कलाकाराने कलेशी प्रामाणिक राहायला हवे – सुबोध भावे
Just Now!
X