News Flash

सोनाक्षीची ढासू एण्ट्री; ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’चं नवं पोस्टर रिलीज

अजय देवगण उलगडणार ‘त्या’ ३०० महिलांच्या अदभूत शौर्याची गोष्ट

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ हा नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज झाला आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी डिझनी हॉटस्टावर या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

१९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावर हा चित्रपट आधारीत आहे. एका सत्य कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माधापार गावातील ३०० महिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारताला युद्धात विजय मिळवून देण्यासाठी या महिलांनी दिलेले योगदान कथेतून मांडण्यात आले आहे.

अजय देवगणने या चित्रपटात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण देशभरात सिनेमागृह बंद असल्यामुळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा शौर्यावर आणखी चित्रपट बनवले जाणे आवश्यक आहे असे अजय देवगणे व्हर्च्युल पत्रकार परिषदेत सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 8:06 pm

Web Title: bhuj the pride of india sonakshi sinha sunderben jetha madharparya mppg 94
Next Stories
1 ‘गरीबांवर असा अत्याचार भारतातच होऊ शकतो’; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका
2 “हा पदार्थ मी आयुष्यभर न कंटाळता खाऊ शकते”; दीपिकाचं भन्नाट उत्तर
3 हाच खरा नायक! ६ वर्षांच्या ‘सुपरहिरो’ला फरहान अख्तरने केला सलाम
Just Now!
X