कलर्स वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता हे दोन असे स्पर्धक आहेत, ज्यांच्यात घरात येण्याआधीपासूनच भांडणं होती. त्यांच्यातील याच भांडणाने घरच्यांसोबत प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले होते. यादरम्यान शिल्पाच्या चाहत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून सध्या सोशल मीडियावर शिल्पा शिंदेचीच चर्चा होताना दिसते. शिल्पा आर्मी या नावाने ट्विटर युजर असणाऱ्या एका व्यक्तीने बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विकास शिल्पाच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसतो.

सर्वातआधी प्रियांक शिल्पाच्या सौंदर्याचे कौतुक करताना म्हणतो की, ती फार सुंदर दिसते. यावर विकास म्हणतो की, हा ती खरंच सुंदर दिसते. देवाने तिला फार सुंदर बनवले आहे. या दोघांचे बोलणे अर्शीला फारसे आवडलेले दिसत नाही. असंच तिचं कौतुक तिच्या समोर करा म्हणजे ती अजून वेडी होईल. यावर विकास अर्शीला बोलतो की, हे काही मी तिच्या समोर बोलणार नाही. पण जर एखादी व्यक्ती चांगली दिसत असेल तर मी त्याचे कौतुक करतो. गेल्या आठवड्यात जेव्हा ती स्विमिंग पूलमध्ये गेली तेव्हा ती फार सुंदर दिसत होती.