नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतनं पुन्हा एकदा चर्चेत येण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बिग बॉस १२’ चे स्पर्धक आणि भजनसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप जलोटांसोबत मला आंघोळ करायची आहे असं वादग्रस्त वक्तव्य तिनं केलं आहे.

नुकतीच तिनं व्हुट बीग बझमध्ये उपस्थिती लावली. यावेळी या शोचा होस्ट अपारशक्ती खुराना यानं राखीला एक प्रश्न विचारला. बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांनी कोणती गोष्ट दान करावी? असा तो प्रश्न होता. यावर राखीनं जस्लिननं तिचे कथित प्रियकर अनुप जलोटांना दान करावं, मी त्यांना खरेदी करायला एका पायावर तयार आहे. मला त्यांच्यासोबत अंघोळ करायची आहे. जस्लिननं त्यांच्यासाठी मेकअप- कपडे सोडायला नकार दिला मग आता उरलंच काय? असं म्हणत राखीनं आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सगळ्यांचं लक्ष  वेधलं.

या कार्यक्रमादरम्यान श्रीसंत हा माझा सर्वात आवडता स्पर्धक असून अंतिम फेरीमध्ये त्याच्यासोबत मेघा धाडे, जस्लिन आणि दीपिका पोहोचतील असा विश्वासही तिनं व्यक्त केला.