20 November 2019

News Flash

Bigg Boss Marathi 2 : ‘ही’ स्पर्धक झाली पहिली महिला कॅप्टन

‘सही रे सही’ या टास्कमध्ये जिंकून ती कॅप्टन झाली आहे

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस मराठीच्या २ पर्वाला सुरुवात झाली आहे. या घरामध्ये सदस्यांना एकत्र राहून चार आठवडे झाले असून आता प्रत्येकाला एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज आला आहे. त्यामुळे घरात देण्यात येणाऱ्या टास्कची रंगत आता वाढताना दिसते. याच दरम्यान घरातील काही सदस्यांना घरातून बाहेर पडावं लागलं. तर नुकताच वाईल्ड कार्ड एण्ट्रीच्या माध्यमातून हिना पांचाळचा घरात प्रवेश झाला आहे. त्यातच आता कॅप्टन्सीसाठी रंगलेल्या डावामध्ये वैशाली म्हाडेची कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वैशाली घरातील पहिली महिला कॅप्टन ठरली आहे.
बिग बॉसने दिलेल्या ‘सही रे सही’ या टास्कमध्ये जिंकून वैशाली कॅप्टन झाली आहे. वैशालीने फळ्यावर सर्वाधिक ऑटोग्राफ म्हणजेच २७६ स्वाक्ष-या करून कार्य जिंकले.

झी मराठीवरच्या ‘सारेगमप’ या रिअॅलिटी शोव्दारे वैशालीने कलाविश्वामध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शो केले असून हिंदी-मराठी टिव्ही आणि चित्रपटांच्या गाण्यासाठी तिने तिचा आवाज दिला आहे. हिंदी-मराठी टेलिव्हीजनवर १० रिअॅलिटी शो केल्यावर वैशालीचा बिग बॉस हा अकरावा रिअॅलिटी शो आहे.

वैशालीने पहिल्या दिवसापासूनच कोणताही मुखवटा न घालता खरेपणाने या रिअॅलिटी शोमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. म्हणूनच जेव्हा वैशाली कॅप्टन झाली तेव्हा शिवने आणि संपूर्ण घरच्यांनी तिचे कॅप्टन रूममध्ये थाटात स्वागत केले.

First Published on June 18, 2019 3:52 pm

Web Title: bigg boss marathi 2 first lady captain vaishali mhade ssj 93
Just Now!
X