20 November 2019

News Flash

‘बिग बॉस मराठी’त पहिली वाइल्ड कार्ड एण्ट्री

बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची एण्ट्री

बिग बॉस मराठी वीकेंडचा डावमध्ये सदस्यांनी आठवडाभर घातलेला गोंधळ, भांडण, टास्क यावर महेश मांजरेकरांनी सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. बिग बॉस मराठीत अगदी पहिल्या दिवसापासून वादामुळे चर्चेत असलेली शिवानी सुर्वेने दोन – तीन दिवस जो काही गोंधळ घातला, त्यावर शिवानी सुर्वेलादेखील महेश मांजरेकरांनी कडक शब्दांत समज दिली. शिवानीची बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट झाली आणि घरामध्ये सिझनमधली पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. हिना पांचाळची घरात धमाकेदार एण्ट्री झाली. हिना उत्कृष्ट नृत्यांगना, अभिनेत्री व मॉडेल आहे.

ग्रँड फिनालेपर्यंत कोण पोहोचलं असं वाटतं असा प्रश्न महेश मांजरेकरांनी हिनाला विचारलं. त्यावर ती म्हणाली, ‘अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे हे दोघं मला स्टेजवर घेऊन येत असल्याचं स्वप्न पडलं’. म्हणजेच पराग, अभिजीत तिच्यासोबत अंतिम फेरीत असतील असे तिने सांगितले. तर दिगंबर नाईक, सुरेखा पुणेकर, किशोरी शहाणे आणि नेहा शितोळे या ग्रँड फिनालेमध्ये मला दिसत नाही असेदेखील तिने सांगितले.

हिनाच्या घरात येण्याने काय होणार, ती कोणत्या ग्रुपमध्ये जाणार, तिचा घरातला वावर कसा असेल, प्रेक्षकांची मनं ती जिंकू शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

First Published on June 16, 2019 5:26 pm

Web Title: bigg boss marathi 2 first wild card entry heena panchal
Just Now!
X