Bigg Boss Marathi. सुरुवातीपासूनच प्रकाशझोतात असलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाचं विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिला मिळालं आहे. मेघा या पर्वाची विजेती ठरली असून, अभिनेता पुष्कर जोग याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. अतिशय दिमाखदार अशा अंतिम सोहळ्यात मेघाच्या नावावर ‘बिग बॉस मराठी’च्या विजेतेपदाचा शिक्कामोर्तब करण्यात आला. या विजेतेपदासह मेघावर शुभेच्छांचा वर्षाव होतच आहे. पण, त्यासोबतच तिच्यावर बक्षीसांचीही बरसात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये विजेत्याच्या नावाबद्दल जितकी उत्सुकता असते तितकच जेतेपदासाठी मिळणाऱ्या बक्षीसाबद्दलही अनेकांनाच कुतूहल लागून राहिलेलं असतं. सध्याच्या घडीला मेघाही याचाच अनुभव घेत असावी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस मराठी’ची विजेती म्हणून तिला १८ लाख ६० हजार रुपये आणि मिळाले आहेत. त्यासोबतच तिला एक आलिशान घरही बक्षीस स्वरूपात मिळालं आहे.

Bigg Boss Marathi : विजेती मेघा धाडेबद्दल जाणून घ्या ‘या’ पाच गोष्टी

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची सांगता झाली असून, खऱ्या अर्थाने मेघा धाडे महाराष्ट्राची ‘बिग बॉस’ ठरली आहे. या घरात, कार्यक्रमात प्रवेश केल्यानंतर अगदी पहिल्याच दिवसापासून विजेतेपदावर मेघाची नजर होती. किंबहुना आपण या कार्यक्रमात (स्पर्धेत) विजेपेद मिळवणारच असाच तिचा आत्मविश्वास सुरुवातीपासूनच पाहायला मिळाला होता. प्रत्येक टास्क म्हणू नका किंवा मग घरातील रणनिती. लहानमोठ्या सर्वच गोष्टींमध्ये मेघाने स्वत:ला सिद्ध केलं होतं. ज्यामुळे फार कमी वेळातच तिने चाहत्यांच्या मनातही घर केलं. परिणामी चाहत्यांची साथ आणि आत्मविश्वासाच्या बळावर मेघाने बाजी मारत ‘बिग बॉस’चं जेतेपद मिळवलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi winner megha dhade prize money
First published on: 23-07-2018 at 08:48 IST