06 March 2021

News Flash

‘बिगिल’चा रजनीकांत यांना धक्का; कमाईच्या बाबतीत टाकलं मागे

'बिगिल'ने मोडला 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय आणि नयनतारा यांची मुख्य भूमिका असलेला ‘बिगिल’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे चाहत्यांमध्ये या चित्रपटाची दिवसेंदिवस क्रेझ वाढत आहे. त्यामुळे हा चित्रपट विजयच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता या चित्रपटाने दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या एका चित्रपटाचाही रेकॉर्ड मोडला आहे.

‘बिगिल’ने केवळ १७ दिवसांमध्ये ३०० कोटी रुपयांची कमाई केली असून कमाईच्या आकडेवारीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच या चित्रपटाने कमाईमध्ये रजनीकांत यांच्या रोबोट चित्रपटाचाही रेकॉर्ड मोडला आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या रोबोटचं वर्ल्डवाइड कलेक्शन २९० कोटी रुपये झालं होतं. तर बिगिलने केवळ १७ दिवसांमध्ये ३०० कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे.

वाचा : ‘हे राम’ वाणी कपूरनं हे काय केलं, सोशल मीडियावर झाली ट्रोल

दरम्यान, ‘बिगिल’ हा तामिळ चित्रपट असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती एजीएस इन्टरटेमेंट अंतर्गत करण्यात आली आहे. तर चित्रपटाला संगीतकार ए. आर. रहमान यांचं संगीत लाभलं आहे. हा चित्रपट देशभरामध्ये ४२०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 12:59 pm

Web Title: bigil box office update vijays sports drama collects rs 300 in 17 days ssj 93
Next Stories
1 धाकट्या लेकीचं पत्र वाचून सुश्मिताच्या डोळ्यात अश्रू
2 ‘स्वराज से बढकर क्या?’; ‘तान्हाजी’च्या रुपातील अजय देवगणचा लूक प्रदर्शित
3 Video : बंदिस्त पिंजरा तोडून ‘गर्ल्स’ आल्या सर्वांसमोर
Just Now!
X