29 October 2020

News Flash

आलियाची बहीण म्हणते, आत्महत्या केली असती पण…

'ज्यावेळी नैराश्यग्रस्त व्यक्तींच्या आत्महत्यांविषयी आपण ऐकतो तेव्हा लगेचच आपल्याला स्वत:च्या आयुष्याचा एक टप्पा डोळ्यांसमोर येतो'

आलिया भट्ट, शाहीन भट्ट, Alia Bhatt, Shaheen

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्याच्या घडीला तिच्या कारकिर्दीच्या परमोच्च शिखरावर आहे, असंच म्हणावं लागेल. तिच्या वाट्याला येणाऱ्या चित्रपटांपासून ते अगदी तिच्या खासगी आयुष्यापर्यंत बऱ्यात गोष्टींमध्ये स्थैर्य आलं आहे. पण, सध्या आलिया चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या बहिणीमुळे. आलियाची बहीण शाहीन सध्या प्रकाशझोतात आली आहे, ते म्हणजे तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे.

शाहीनने या पोस्टच्या माध्यमातून तिने सामना केलेल्या ताणतणावाच्या दिवसांचं वर्णन केलं आहे. गेले काही दिवस चर्चेत असणाऱ्या शेफ अँथनी बोर्डैन आणि डिझायनर केट स्पेड यांच्या हायप्रोफाईल आत्महत्यांना अनुसरुन शाहीनने आत्महत्या आणि ताणतणाव आणि नैराश्याविषयी तिचं मत मांडलं आहे. ज्यावेळी या सेलिब्रिटींच्या आत्महत्यांविषयी शाहीनला माहिती मिळाली तेव्हा तिला रडूच कोसळलं. पण तिचं हे रडू केट किंवा अँथनी यांच्यासाठी नव्हतं, तर ते तिच्या स्वत:साठीसुद्धा होतं. कारण काही वर्षांपूर्वी तिनेही आत्महत्या करत जीवनाचा हा प्रवास संपवण्याचा प्रयत्न केला होता.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

ज्यावेळी नैराश्यग्रस्त व्यक्तींच्या आत्महत्यांविषयी आपण ऐकतो तेव्हा लगेचच आपल्याला स्वत:च्या आयुष्याचा एक टप्पा डोळ्यांसमोर येतो, असं शाहीनने एका लेखात म्हटलं होतं. वयाच्या बाराव्या वर्षी शाहीनने नैराश्यग्रस्त परिस्थितीचा सामना केला होता. ज्यावेळी वारंवार तिच्या मनात आत्महत्येचे विचारही येत होते. सध्याच्या घडीला नैराश्यग्रस्त लोकांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात लक्षणीयरित्या वाढ झाल्याचा मुद्दाही तिने अधोरेखित केला. फक्त २०- ३० या वयोगटातच नव्हे तर ६० वर्षांवरील वयोगटालाही या समस्येने विळखा घातला आहे, असं तिने स्पष्ट केलं. शाहीनने याच पस्थितीविषयी उघडपणे भाष्य केल्याबद्दत आलियाने तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या ‘भट्ट सिस्टर्स’ सध्या बऱ्याच चर्चेत आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 11:44 am

Web Title: bollywood actress alia bhatt backs sister shaheen for opening up about depression
Next Stories
1 VIDEO : सुयश टिळकने दिलेलं आव्हान सिद्धार्थ चांदेकर स्वीकारणार का?
2 ‘करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मला कोणत्याच पुरुषाची गरज नाही’
3 Race 3 Review : ‘रेस ३’ चित्रपट नव्हे, तर फालुदा…
Just Now!
X