30 November 2020

News Flash

बोल्डनेसमुळे चर्चेत राहणाऱ्या मल्लिकाचं खरं नाव माहित आहे का?

जाणून घ्या, मल्लिकाचं खरं नाव

बॉलिवूड चित्रपटांतील बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावतने सध्या बॉलिवूडपासून फारकत घेतली आहे. मात्र अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीला येत असते.

आपल्या हॉट आणि मादक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. बऱ्याच वेळा बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री आता कलाविश्वापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यामुळे अनेकदा तिच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असतात. आज मल्लिकाचा वाढदिवस. त्यामुळे मल्लिकाच्या खऱ्या नावाची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात मल्लिकाचा जन्म झाला. खरं तर इतक्या लहानशा गावापासून ते बॉलिवूडपर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक अडचणी, संकट यांच्यावर मात करत मल्लिकाने बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं आणि मल्लिका शेरावत हे नाव घराघरात पोहोचलं. विशेष म्हणजे या अभिनेत्रीचं खरं नाव मल्लिका नसून रीमा लांबा असं आहे.

कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी मल्लिकाने तिचं नाव बदलून मल्लिका शेरावत असं लावण्यास सुरुवात केली होती. शेरावत हे मल्लिकाच्या आईचं आडनाव आहे. त्यामुळे तिने लांबा ऐवजी शेरावत हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. तर मल्लिकाच्या वडिलांचं नाव मुकेश कुमार लांबा असं आहे.

दरम्यान, मल्लिकाने २००२ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं, मात्र ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटात ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने २००३ मध्ये ख्वाहिश चित्रपटातही काम केलं. मात्र, ‘मर्डर’ या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटातही काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 9:07 am

Web Title: bollywood actress mallika sherawat real name ssj 93
Next Stories
1 ‘माझ्या मृत्यूला महेश भट्ट जबाबदार असेल’; व्हिडीओ शेअर करत तिने केले गंभीर आरोप
2 ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ चित्रपट महोत्सव २६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस
3 दोन वर्षांच्या ब्रेकनंतर किंग खानची धमाकेदार एण्ट्री; एकाच वेळी साइन केले तीन चित्रपट
Just Now!
X