News Flash

‘या’ अभिनेत्रीला दीपिका पदुकोणसोबत समलिंगी संबंध ठेवण्याची इच्छा

या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी आहेत

तामिळ चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका आहे. बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या या चित्रपटामधील शाहिदच्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीची लहानशी भूमिका आहे. मात्र तिची ही लहानशी भूमिकादेखील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली आहे. त्यामुळे सध्या कियारा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. त्यासोबतच तिचं चर्चेमध्ये येण्याचं आणखी एक कारण आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये कियाराने बॉलिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्रीसोबत समलिंगी संबंधांमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी कियाराने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्याशी आणि करिअरशीसंबंधित अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी तिला तिच्या रिलेशनशिप बाबत काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर तिनेदेखील मनमोकळेपणाने उत्तरे दिली. या प्रश्न-उत्तरांच्या खेळामध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये तिला ‘बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध ठेवायला आवडतील?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न लावता तिने अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव घेतलं. त्यानंतर तिच्या ‘फिल्मी करिअर मधून एखादा चित्रपट वगळायचा असला, तर कोणता चित्रपट कमी करशील?’ या प्रश्नावर तिने ‘शानदार’चं नाव घेतलं.

दरम्यान, कियारा सध्या ‘कबीर सिंग’मुळे चर्चेत आहे. तर दीपिका तिच्या आगामी ’83’ या चित्रपटामुळे. दीपिकाच्या या आगामी चित्रपटामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार असून तो माजी क्रिकेटर कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर दीपिका त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 10:20 am

Web Title: bollywood actress reveals that she will choose deepika padukone as partner if she was in a same gender relationship ssj 93
Next Stories
1 मोगॅम्बोसाठी अमरीश पुरींऐवजी ‘या’ अभिनेत्याल्या होती पहिली पसंती
2 ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’च्या सेटवर मृणालच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन !
3 Bigg Boss Marathi 2 : महेश मांजरेकरांसोबत रंगणार विकेंडचा डाव, कोण होणार घरातून बाहेर ?
Just Now!
X