Sunny Leone and Daniel Weber. अभिनेत्री सनी लिओनीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. ज्यानंतर सनी आणि तिच्या पतीने निशा नावाच्या एका मुलीला दत्तक घेतलं. निशाच्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडत असतेवेळीच या दोघांनीही सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचं पालकत्वही स्वीकारलं. सध्याच्या घडीला सनी आणि डॅनिअल हे दोघंही त्यांच्या कुटुंबासमवेत काही महत्त्वाचे क्षण व्यतीत करत आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवस सनी आणि डॅनिअल तितक्याच आनंदात घालवताना दिसत आहेत.

सध्या हे सेलिब्रिटी जोडपं चर्चेत आहे ते म्हणजे, डॅनिअलच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे. ज्यामध्ये त्याने आपल्या मुलांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. मुख्य म्हणजे त्याने पोस्ट केलेले फोटो हे अनेकांना खटकतही आहेत. यातील एका फोटोमध्ये डॅनिअल, सनी आणि निशा दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने निशा आणि सनीचं त्याच्या आयुष्यात असणाऱ्या स्थानाविषयी लिहिलं होतं. त्यासोबत एक वडील होण्याचं जे सुख असतं त्याविषयीसुद्धा डॅनिअलने त्याच्या मनीच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

फादर्स डेच्या निमित्ताने डॅनिअलने पोस्ट केलेल्या फोटोवर काहींनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी या फोटोकडे एका सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं. दरम्यान सनी लिओनीनेसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो पोस्ट करत फादर्स डेच्या निमित्ताने एक मित्र, पती आणि वडील या जबाबदाऱ्या लिलया पेलणाऱ्या डॅनिअलचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.