पाकिस्तानातील वादग्रस्त अभिनेत्री वीणा मलिक हिला पाकिस्तानचा सर्वात मोठा टीव्ही समूह असलेल्या जिओ टीव्हीचा मालक व अभिनेता पती आसद बशीर खान यांच्यासह २६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दहशतवादविरोधी न्यायालयाने सुनावली आहे. वीणा मलिकने सांगितले की, वरिष्ठ न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे, त्यामुळे अशा शिक्षा आपण फार गांभीर्याने घेत नाही.
 ईश्वरनिंदेचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिओ व जंग टीव्हीचा मालक मीर शाकीर उर रहमान यांनाही ईश्वरनिंदाकारक टीव्ही मालिका मे महिन्यात दाखवल्याबद्दल शिक्षा दिली आहे. सकाळच्या लाइव्ह शो मध्ये मलिक ही तिच्या नव्या पती समवेत सुफी संगीतावर भक्तिमय गाण्यावर नृत्य करीत असे व ते गाणे महंमद पैगंबराच्या मुलीच्या लग्नावर बेतलेले होते. न्या. शहाबाझ खान यांनी मलिक व बशीर यांच्यासह टीव्ही कलाकार शाइस्ता वाहिदी यांनाही २६ वर्षांची शिक्षा झाली आहे. न्यायालयाने त्यांना १३ लाख रूपयांचा दंड केला आहे व तो दंड वसूल करण्यासाठी वेळ आल्यास  त्यांची मालमत्ता विकण्यास सांगितले आहे. न्यायाधीशांनी त्यांच्यावर ईश्वरनिंदेचा आरोप केला असून त्यांच्यावर चाळीस पानांचे आरोपपत्र होते त्यात पोलिसांनी आरोपींना अटक करावी असे म्हटले होते. न्यायालयाने म्हटले आहे की, गिलगिट-बाल्टिस्तान उच्च न्यायालयात यावर अपील करता येईल. गिलगिट न्यायालयाने ही शिक्षा दिली असली तरी भारताच्या दाव्यानुसार गिलगीट हा काश्मीरचा भाग आहे, त्यामुळे अनेकांच्या मते या आदेशाची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही. तो पाकिस्तानचा पूर्ण स्वरूपी प्रदेश नसून त्या न्यायालयाचे आदेश उर्वरित देशात लागू नाहीत. चारही आरोपी पाकिस्तानच्या बाहेर आहेत. रहमान हा संयुक्त अरब अमिरातीत राहतो, तर इतर तिघे दहशतवाद्यांच्या भीतीने परदेशात आहेत. त्यामुळे अटका केव्हा होणार हे समजू शकले नाही. वाहिदी व जिओ समूहाने दिलगिरी मागितली असून दहशतवाद्यांनी ती फेटाळली.