शनिवारी सकाळी ‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉयने दिल्लीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपमधील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राहुलने या नव्या इनिंगची सुरुवात केल्याचे पाहायाला मिळाले.

हा माझ्या आयुष्यातील एक विलक्षण दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ज्या पद्धतीने देशाला प्रगतीपथावर नेण्याचा सुरुवातीपासूनच प्रयत्न केला आहे, हे खरेच वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या योगदानामुळे जागतिक स्तरावर सर्वांचाच भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे’, असे त्याने ‘एएनआय’ला सांगितले.

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

‘आशिकी’ या चित्रपटातून झळकलेला राहुल रॉय गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर राहिला आहे. एका चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या राहुलला या चित्रपटसृष्टीत इतर चित्रपटांच्या माध्यमातून फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे बऱ्याच काळासाठी तो चित्रपटसृष्टीपासून दूर राहत होता. राहुल २००६ मध्ये टेलिव्हिजन विश्वातील ‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शो मधूनही झळकला होता.