काही चित्रपट हे त्यांच्या कथानकासाठी तर काही हे त्याच्या स्टारकास्टसाठी ओळखले जातात. प्रत्येक चित्रपटाला त्याची एक अशी वेगळी ओळख असते. पण, या साऱ्याला संजय लीला भन्साळी अनेकदा अपवाद ठरतात. कारण, गेल्या काही काळापासून त्यांच्या चित्रपटांमध्ये असे काही घटक समाविष्ट करण्यात आले ज्यांची सुरेख घडी बसवून भन्साळी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरले. त्यांच्या आगामी ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या बाबतीतही असेच पाहायला मिळतेय. राजपूत संस्कृती आणि काल्पनिक कथानक याची सांगड घालत दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर या कलाकारांची साथ घेत भन्साळींनी हा चित्रपट साकारला. भव्यता आणि कलात्मकता यांचा मेळ असणाऱ्या या चित्रपटातील काही संवाद सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

‘पद्मावत’चा ट्रेलर आणि काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले डायलॉग प्रोमो यांच्या माध्यमातून हे संवाद प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि अनेकांच्याच अंगावर काटा उभा राहिला. सोशल मीडियावर तर स्टेटसच्या स्वरुपातही अनेकांनी हे डायलॉग वापरत या चित्रपटाविषयीची उत्सुकता व्यक्त केली. चला तर मग नजर टाकूया अशाच काही डायलॉग्सवर…

राजपूत महिलांच्या धाडसी आणि लढाऊ वृत्तीची प्रचिती देणारा एक डायलॉग म्हणजे,
‘राजपूती कंगन में उतनी ही ताकत है जितनी राजपूती तलवार में…’
दीपिका पादुकोण (राणी पद्मावती)

राजपूतांच्या रक्तात असणारा निर्भीडपणा सांगणारे हे डायलॉग…
‘चिंता को तलवार की नोक पे रखे, वो राजपूत… रेत की नाव लेकर समुंदर से शर्त लगाए, वो राजपूत… और जिसका सर कटे फिर भी धड दुश्मन से लडता रहे, वो राजपूत…’
शाहिद कपूर (महारावल रतन सिंह)

‘कह दीजिए अपने सुल्तान से कि उनकी तलवार से ज्यादा लोहा हम सूर्यवंशी मेवाडियों के सीने में है…’
शाहिद कपूर (महारावल रतन सिंह)

राणी पद्मावती, तिच्याविषयी सांगण्यात आलेल्या दंतकथा आणि ज्या महाकाव्यावर भन्साळींचा हा चित्रपट आधारित आहे, त्याचा सारांशच जणू या डायलॉगमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
‘असुरों का विनाश करने के लिए देवी को भी गढ से उतरना पडा था. चित्तौड के आंगन में एक और लढाई होगी जो न किसी ने देखी होगी न सुनी होगी. और वो लढाई हम क्षत्राणियाँ लढेंगी. और यही अलाउद्दीन के जीवन की सबसे बडी हार होगी.’
दीपिका पादुकोण (राणी पद्मावती)