Dilip Thakur article

दिलीप ठाकूर
हिंदी चित्रपटात गाण्याची जागा ही कशीही, कधीही, कुठेही असू शकते, पण ते गाणे पडद्यावर रंजक हवे आणि ऐकायला श्रवणीय असावे. असाच एक गाण्याचा प्रसंग म्हणजे, चित्रातील नायक अथवा नायिका गावू लागते.

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

हुस्न वाले तेरा जवाब नहीं
कोई तुझ-सा नहीं हज़ारों में

आशा पारेख राजेन्द्र कुमारचे छान चित्र रेखाटत आहे आणि अशातच त्याच चित्रातील राजेन्द्र कुमार गाऊ लागतो. तो आशा पारेखच्या सौंदर्याचे कौतुक करू लागतो आणि गाणे एकदम झकास गार्डनमध्ये जाते. आणि अधिकच खुलते,

तू है ऐसी कली जो गुलशन में
साथ अपने बहार लायी हो
तू है ऐसी किरण जो रात ढले
चाँदनी में नहा के आयी हो
ये तेरा नूर ये तेरे जलवे
जिस तरह चाँद हो सितारों में
हुस्न वाले …

चेन्नईच्या (तेव्हाच्या मद्रास) जेमिनी प्रॉडक्शनच्या ‘घराना’ (१९६१) या कौटुंबिक चित्रपटातील हे गाणे शकिल बदायुनी यांनी लिहिले असून त्याला रवि यांचे संगीत आहे. आणि हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायलयं हे एव्हाना तुम्ही आवाजावरून ओळखले असेलच. राजेन्द्र कुमार आणि मोहम्मद रफी हे नायक आणि पार्श्वगायक असे सुपरहिट समीकरण, त्यातील हे एक लोकप्रिय गाणे.

तेरी आँखों में ऐसी मस्ती है
जैसे छलके हुए हों पैमाने
तेरे होंठों पे वो खामोशी है
जैसे बिखरे हुए हों अफ़साने
तेरी ज़ुल्फ़ों की ऐसी रंगत है
जैसे काली घटा बहारों में
हुस्न वाले …

एस. एस. वासन दिग्दर्शित या चित्रपटात नायिकेचे हे स्वप्नगाणं आणि त्यात नायक तिच्या सौंदर्याचे कौतुक करतोय असा हा छानसा प्रसंग आहे. राजेन्द्र कुमार हा त्या काळातील रोमँटिक हिरो आणि ज्युबिली कुमार, त्यामुळे त्याची अभिनय सहजता या गाण्यातही दिसते. आशा पारेख नृत्य तारका, त्या गुणाचा या गाण्यात वापर करून घेतला आहेच. या गाण्यात प्रेमिकेच्या सौंदर्याची निसर्गा विविध गोष्टींशी तुलना करत प्रियकर अधिक खुलत जातो.

तेरी सूरत जो देख ले शायर
अपने शेरों में ताज़गी भर ले
एक मुसव्विर जो तुझ को पा जाए
अपने ख़्वाबों में ज़िंदगी भर ले
नग़मागर ढूँढ ले अगर तुझ को
दर्द भर ले वो दिल के तारों में
हुस्न वाले तेरा जवाब नहीं …

शकिल यांच्या चित्रपट गीतांमध्ये उर्दूचा कल्पक वापर असल्याने त्यांची काही गाणी एक प्रकारची शेरो शायरीच जणू! म्हणूनच तर या गाण्याचा गोडवा आपलासा करतो. आणि ते सहज गुणगुणायला आपण सुरूवातही करतो. आणि तेच तर कोणत्याही गाण्याचे यश असते.