Dilip Thakur article
दिलीप ठाकुर

दिलीप ठाकूर
निसर्गाचे  आणि छान हवामानाचे  कौतुक करता करताच प्रेयसीलाही प्रभावित (अर्थातच इम्प्रेस)  करणारी गाणी हेदेखील आपल्या हिंदी चित्रपटाचे वैशिष्ट्य. आपली प्रेम भावना प्रेयसीपर्यंत पोहचवण्यात यश मिळवणे असाच या गाण्यातून हेतू दिसतो, यासाठी नट आजूबाजूच्या सुंदर वातावरण व हवामानाचा आधार घेताना दिसतो.

आज मौसम बड़ा बेईमान है
बड़ा बेईमान है, आज मौसम
आने वाला कोई तूफ़ान है
कोई तूफ़ान है, आज मौसम

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

प्रसन्न अशा निसर्गरम्य ठिकाणी  सूट बूट टायमधील धर्मेंद्र ग्लॅमरस मुमताजला उद्देशून वातावरण कसे छान आहे हे सांगत  छान मूडमध्ये मोहम्मद रफीच्या आवाजात गातोय. संपूर्ण गाणे एकाच परिसरात आहे. छान हिरवाईची साथ आहे आणि गाणेही दिलखुलास आहे. निर्माता आर. सी. कुमारच्या ए. भीमसिंग दिग्दर्शित ‘लोफर’ (१९७३) मधील हे गाणे. कधीही सहज गुणगुणावे इतके सुमधुर.

क्या हुआ है, हुआ कुछ नहीं है
बात क्या है पता कुछ नहीं है
मुझसे कोई ख़ता हो गई तो
इस में मेरी ख़ता कुछ नहीं है
ख़ूबसूरत है तू रुत जवान है
आज मौसम बड़ा बेईमान है

कधी निसर्गावर भाष्य तर कधी स्वतःबद्दल काही स्पष्टीकरण. आनंद बक्षी एकाच गाण्यात अनेक संदर्भ गुंफण्यात अनेकदा यशस्वी ठरत. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या असंख्य श्रवणीय व लोकप्रिय गाण्यातील हे एक.

काली-काली घटा दर रही है
ठंडी आहें हवा भर रही है
सबको क्या-क्या गुमान हो रहे हैं
हर कली हम पे शक कर रही है

फूलों का दिल भी कुछ बदगुमान हैधर्मेंद्र अशा सरळ चालीतील गाण्यात अनेकदा शोभलाय. त्यातही पूर्वीच्या अनेक गाण्यात त्या काळातील हिरो सुटाबूटात-टायमध्ये असत हे आज पाहताना काहीसे विचित्र वाटते काय हो? मुमताज कायमच नटखट अदाकारीसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री. येथे त्या शैलीला थोडासाच वाव मिळालाय इतकेच. ती कसर ती गोड हसत भरून काढते.

ऐ मेरे यार ऐ हुस्न वाले
दिल किया मैंने तेरे हवाले
तेरी मर्ज़ी पे अब बात ठहरी
जीने दे चाहे तू मार डाले
तेरे हाथों में अब मेरी जान है

प्रेयसीच्या गुण व सौंदर्याचे भरभरून कौतुक करतानाच आपण मात्र त्यापुढे पराभूत झाल्याची जणू कबूली देण्याचा हा प्रयत्न. सृष्टीसौंदर्य व प्रेयसीचे सौंदर्य या दोन्हीची सांगड घालणारे हे गाणे ‘लोफर’च्या यशात भर घालणारे ठरले.