22 January 2020

News Flash

शब्दांच्या पलिकडले : सावन का महीना…

या गाण्याच्या सुरुवातीची 'शोर' आणि 'सोर' ही छेडछाड छान रंगलीय.

सुनील दत्त आणि नूतन चित्रपट – मिलन (सौ. यूट्युब)

दिलीप ठाकूर
हिंदी चित्रपटात गाण्यांच्या जागा केवढ्या तरी. आणि हेच तर आपल्या चित्रपट संस्कृतीचे विशेष आहे. अशीच एक पूर्वीच्या चित्रपटातील गाण्याची जागा म्हणजे, नायक अथवा नायिका लिहिताना गाणे सुरु होणे आणि एकदा का या गाण्याचा अंतरा सुरु झाला की  रंगत येते.

सावन का महीना, पवन करे सोर
जियारा रे झूमें ऐसे, जैसे बनमां नाचे मोर

हे गाणे अगदी तसेच! जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर एव्हाना निर्माते एल. व्ही. प्रसाद यांच्या ‘मिलन’ (१९६७) चित्रपटातील ग्रामीण भागातील नायक (सुनील दत्त) आणि नायिका (नूतन) नक्कीच आले असणार. या गाण्याच्या सुरुवातीची शोर आणि सोर ही छेडछाड देखील छान रंगलीय. फार पूर्वी विदेशातील स्टेज शोमध्ये या गाण्याचे गायक मुकेश आणि लता मंगेशकर हे गाणे ही छान मस्ती साकारत या गाण्याचा आणि श्रोत्यांचा मूड पटकन पकडत.

राम गजब ढाये ये पुरवइया
नैय्या संभालो कित खोये हो खेवइया
पुरवइया के आगे चले ना कोई जोर

गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा हा कारकिर्दीतील सुरुवातीच्या चित्रपटातील एक. आणि या गाण्याने प्रचंड लोकप्रियता संपादलीय. इतकी की संजय दत्त आपले लहानपणीचे आवडते गाणे म्हणून आपल्या मुलाखतीत याच गाण्याचा उल्लेख करतो. त्यातून त्याचे त्या वयातील आपल्या पित्यावरील प्रेमही सिद्ध होते.

मौजवा करे क्या जाने हम को इसारा
जाना कहाँ है पूछें नदिया की धारा
मर्ज़ी है तुम्हारी ले जाओ जिस ओर

गाणे आता एकदम होडीत जाते. मोठ्या शिडाची ही होडी सुनील दत्त ताकदीने वल्हवतोय आणि नूतन या प्रवासाचा आनंद घेतेय. या चित्रपटात होड्या या जणू एखाद्या व्यक्तीरेखेनुसार आहेत. बरेचसे प्रसंग होडीत घडतात.

जीन के बलम बैरी गये हैं विदेसवा
आई है ले के उनके प्यार का संदेसवा
कारी, मतवारी घटायें घनघोर

आता रात्र होते, मात्र या दोघांचा होडीतील प्रवास सुरु आहे. ए. सुब्बाराव दिग्दर्शित या चित्रपटात पुनर्जन्मावर आधारीत कथा आहे. पूर्वी अनेक चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय असत, ‘मिलन’बाबतही तोच अनुभव येतो. त्यात हे सर्वोत्तम. आता एका स्टेजवर नूतन गातेय आणि समोरचा श्रोतृवर्ग या गाण्याचा आनंद घेतोय आणि त्यात देवेन वर्माही आहे. विनोदाचे टायमिंग साधणारा हा कलाकार सुरुवातीस चक्क खलप्रवृतीच्या भूमिका साकारे. असो. या गाण्याच्या नुसत्या आठवणीनेही आपण फ्रेश होतो, तर मग आणखी काय हवं? नूतनची या गाण्यातील अदाकारी खूप सहज व्यक्त झालीय, यातच तिच्या अभिनयाची ताकद दिसते.

First Published on August 22, 2018 1:05 am

Web Title: bollywood music hindi movie milan song sawan ka mahina pawan kare shor
Next Stories
1 Video : अंगावर रोमांच उभा करणारा ‘तुंबाड’चा टीझर
2 Kerala Floods : स्टार इंडियाकडून केरळमधील पुरग्रस्तांना ५ कोटींची मदत
3 अर्शद वारसीचं ट्विटर अकाऊंट हॅक
Just Now!
X