अभिनेता सलमान खानची निर्मिती संस्था सध्या एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ‘सलमान खान फिल्म्स’मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच ‘सीईओ’ पदावर कार्यरत असणाऱ्या अमर बुटाला यांनी ही निर्मिती संस्था सोडली आहे.

‘सलमान खान फिल्म्स’ला रामराम ठोकल्यानंतर अमर यांनी ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’मध्ये ‘चीफ अॅक्विझिशन ऑफिसर’ या पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी ‘सलमान खान फिल्म्स’मधून काढता पाय घेतला की, त्यांची हकालपट्टी करण्यात आली हाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. ‘स्पॉटबॉय इ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी बुटाला ‘यूटीव्ही मोशन पिक्चर्स’ आणि ‘बालाजी मोशन पिक्चर्स’च्या ‘डेव्हलपिंग अॅण्ड एक्झिक्युटिंग प्रोजेक्ट्स’मध्ये सहभागी होते. ‘बजरंगी भाईजान’, ‘हिरो’, ‘ट्युबलाइट’ या चित्रपटांसोबतही ते जोडले गेले होते.

वाचा : रणवीर सिंगने थकवला ड्रायव्हरचा दोन महिन्यांचा पगार

पण त्यानंतरच्या काळात अमर बुटाला गरिमाच्या साथीने त्यांची कामं पाहात होते. पण, त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या परफॉर्मन्सवर सलमान आणि त्याची बहिण अलविरा नाराज होते. त्यानंतर वारंवार त्यांच्या कामाविषयी ताकीद देऊनही ‘ट्युबलाइट’ नंतर गरिमा आणि अमरच्या टीमने एकाही चित्रपटाचा व्यवहार केला नव्हता. त्यामुळे कार्यकारिणीच्या बैठकीतही बरेच मतभेद पाहायला मिळत होते.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

हे सर्व प्रकरण पाहता अलविराने मागच्याच आठवड्यात अमर बुटालाच्या पदावर त्यांच्याऐवजी नवीन व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. किंबहुना बुटाला यांची उचलबांगडी होणार अशी त्यांच्या कंपनीतील काही सदस्यांना कल्पना असल्याचंही म्हटलं जात आहे.