25 February 2021

News Flash

किचन वर्सेस लिव्हींग रूम; नेहाने शेअर केली घरातील रिअ‍ॅलिटी

नेहाला करावी लागतात घरातली 'ही' कामं

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. २०२० मध्ये रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधलेल्या नेहाचा लग्नसोहळा चांगलाच गाजला होता. त्यामुळे तिच्या लग्नापासून ती सातत्याने चर्चेत येत आहे. नेहाने तिच्या लग्नसोहळ्यापासून ते हनिमूनपर्यंत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, यामध्ये तिच्या सासुरवाडीतील एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.

लग्नानंतर नेहाने रोहनप्रीतसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्येच तिने तिच्या सासुरवाडीतील काही फोटो शेअर केले आहेत. यात ती एका फोटोमध्ये ती सुनबाई असल्याची जबाबदारी पार पाडत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती सेलिब्रिटी लाइफ मेंटन करत असल्याचं दिसून येत आहे.

नेहाने शेअर केलेल्या फोटोला तिने किचन वर्सेस लिव्हिंग रुम असं कॅप्शन दिलं आहे. एका फोटोमध्ये नेहा स्वयंपाक घरात काम करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती फोटोसाठी छान पोझ देताना दिसत आहे.

 वाचा : ‘मला स्त्रियांचा मेंदू नाही शरीर आवडतं’; राम गोपाल वर्मांचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, सध्या नेहाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. नेहा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका असून अलिकडेच तिचं ख्याल रखा कर हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला. या अल्बममध्ये तिच्यासोबत पती रोहनप्रीतने स्क्रिन शेअर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 4:34 pm

Web Title: bollywood singer neha kakkar share new photos kitchen vs living room ssj 93
Next Stories
1 ‘श्रीकांत मिशन के पिछे, और विलेन..’ ; ‘फॅमेली मॅन 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
2 नेहा कक्करची जादू कायम, आता मिळाला डायमंड पुरस्कार
3 गुरु रंधावाने केला साखरपुडा? फोटोतील ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?
Just Now!
X