मराठी चित्रपटासाठी दादा कोंडके यांनी दिलेले योगदान हे अमूल्य आहे. दादांवर असलेल्या प्रेक्षकांच्या प्रेमापोटी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पीपल्स आर्टस सेंटर मुंबई व वॅन्स म्युझिप ग्रुप यांच्यावतीने ‘एकच सोंगाडया’ हा संगीतमय सोहळा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता.


दादा कोंडके यांचा सहवास लाभलेले व त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक दिग्गज मान्यवरांचा सत्कर यावेळी करण्यात आला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, शक्ती कपूर, गायक अनुप जलोटा, संगीतकार राम-लक्ष्मण, रामदास फुटाणे, उत्तरा केळकर, विजू खोटे यांसारखे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांनी सांगितलेल्या हृद आठवणींमुळे दादांच्या व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू यानिमित्ताने उलग़डले गेले. दादांच्या चित्रपटांवर आधारित श्याम पेठकर लिखित ‘दादागिरी- एक- आठवण साठवण’ पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.