प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री ब्रिटनी स्पिअर्स हिने आपल्या वडिलांविरोधात आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. वडील जेमी स्पिअर्स तिची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. एका खासगी कंपनीच्या मदतीनं ही आर्थिक फसवणूक केली जात आहे, असा खळबळजनक आरोप ब्रिटनीने केला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरु आहे.

अवश्य पाहा – होऊ दे खर्च! १० मिनिटांच्या शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने घातला ३७ कोटींचा ड्रेस

टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनी गेल्या काही वर्षांपासून नैराश्येमध्ये होती. या काळात जेमी स्पिअर्स तिच्या संपत्तीची देखभाल करत होते. परंतु अभिनेत्री नैराश्येत असल्याचा गैरफायदा घेत त्यांनी कंपनीच्या कामात आर्थिक घोळ घातला, असा आरोप ब्रिटनीने केला आहे. ब्रिटनीला आपल्या संपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी बेस्मर ट्रस्टकडे सोपवण्यासाची इच्छा आहे. परंतु जेमी यांनी त्यास नकार दिला. त्यांनी ब्रिटनीला न सांगता ती जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपवली आहे. हा निर्णय त्यांनी आर्थिक गोंधळ घालण्यासाठीच घेतला, असा आरोप ब्रिटनीने केला आहे.

अवश्य पाहा – करोनामुळे वडिलांचं निधन; आठवड्याभरातच ‘या’ अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट

ब्रिटनीचे हे सर्व आरोप जेमी स्पिअर्स यांनी फेटाळून लावले आहेत. “ती माझी मुलगी आहे. ती जर चुकीच्या मार्गावर असेल तर तिला सावध करणं हे माझं कर्तव्य आहे. मी कायदेशीररित्या तिचा आर्थिक सल्लागार होतो. अन् मी माझं कर्तव्य चोख बजावलं.” असं स्पष्टीकरण जेमी यांनी दिलं. या प्रकरणात प्रचंड मोठा आर्थिक गुंता असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.