शाहरुखचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपट एकापाठोपाठ एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. प्रदर्शनानंतर तीन दिवसांमध्ये चित्रपटाने १०० कोटी रुपये कमाविले आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर इतरही चांगली कमाई करत आहे.
गुरुवारी एका दिवसात चित्रपटाने ६.७५ कोटी रुपये केवळ पेड प्रिव्हयूमधून कमावून दोन दिवसांमध्ये ६७.९२ कोटींचा गल्ला जमावला. यामध्ये नुकतीच आलेली रविवारची आकडेवारी मिळून चित्रपटाचा गल्ला १०० कोटींच्यावर गेला आहे.

तसेच, पाकिस्तानमध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्विट केले आहे.

 

‘रमजान ईद’च्या मुहुर्तावर ‘चेन्नई एक्स्प्रेस’भारतात ३५०० प्रिंट तर परदेशात ७०० प्रिंटसह प्रदर्शित झाला होता. यूटीव्ही मोशन आणि शाहरुखच्या रेड चिलीज कंपनीची निर्मिती असलेला हा चित्रपट ५०हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला असून यामध्ये मोरक्को, जर्मनी, स्विझर्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इस्रायल आणि पेरू या देशांचा समावेश आहे.