News Flash

सचिनने न ओळखल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता नाराज

मला लाज वाटत होती.

सचिन तेंडुलकर

क्रिकेटच्या विश्वातील देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांची संख्या अगणित आहे. केवळ क्रिकेट प्रेमींच्याच नाही तर इतर खेळांची आवड असणाऱ्या व्यक्तींच्या मनातही सचिनने आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका आघाडीच्या अभिनेत्याचाही समावेश आहे. तो अभिनेता म्हणजेच चियान विक्रम. पण क्रिकेटच्या देवाने आपल्याला न ओळखल्याने या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने नाराजी व्यक्त केली.

वाचा : ते माझ्यासाठी चार वर्षे थांबले – अनुष्का शेट्टी

‘स्केच’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी विक्रम सध्या कोची येथे गेला आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना विक्रमने सचिनसोबतच्या त्याच्या ‘फॅनबॉय एन्काउन्टर’बद्दल सांगितले. विक्रम मुंबईहून चेन्नईला जात असताना त्याच विमानातून सचिनही प्रवास करत होता. पण, त्यावेळी सचिनने आपल्याला न ओळखल्याने विक्रमला वरमल्यासारखे झाले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता असूनही आपल्याला जर कोणी ओळखत नसेल तर त्यामुळे थोडे वाईट वाटणे स्वाभाविक आहे.

याविषयी ‘मनोरमा’शी बोलताना विक्रम म्हणाला की, ‘विमानात एक व्यक्ती माझ्या दिशेने चालत आली आणि माझ्या बाजूला येऊन बसली. तो सचिन होता. मी चकीत झालो आणि माझ्या तोंडून ‘ओ माय गॉड’ असे उच्चारले गेले. त्यावर तो माझ्याकडे वळला आणि त्याने मला ‘हाय’ असे म्हटले. यावर मी फक्त ‘सॉरी सर’ एवढेच म्हणू शकलो. मला लाज वाटत होती. त्याचसोबत त्याने मला न ओळखल्याने मी नाराजही झालो होतो.’ अखेर विक्रमननेच नंतर स्वतःहून पुढाकार घेतला. सचिनने न ओळखल्याने आपल्याला दुःख झाले असल्याचे विक्रमने त्याला सांगितले.

वाचा : सतारवादक अनुष्का शंकरने मोडला सात वर्षांचा संसार

‘तुला माझ्याबद्दल कसे माहिती नाही, असा सवाल मी त्याला केला. त्यावर, मी भारतीय चित्रपट बघत नाही. क्वचितच कधीतरी परदेशी चित्रपट पाहतो, असे त्याने मला सांगितले. त्यानंतर जवळपास दोन तासांच्या प्रवासात आम्ही केवळ आमच्या मुलांविषयीच बोलत होतो’, असे विक्रम म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 11:11 am

Web Title: chiyaan vikram felt disappointed when sachin tendulkar didnt recognise him
Next Stories
1 ते माझ्यासाठी चार वर्षे थांबले – अनुष्का शेट्टी
2 TOP 10 NEWS : पाकिस्तानी असल्याची व्यथा मांडणाऱ्या अभिनेत्रीपासून अमिषा पटेलपर्यंत..
3 नाटक बिटक : यंदाच्या रंगमहोत्सवातून भाषा, संस्कृतीचा समृद्ध अनुभव
Just Now!
X