कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलिब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राचं मनं जिंकत आहेत. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी प्रेक्षकांचे हे लाडके स्पर्धक घेऊन येत आहेत मनोरंजनाची पर्वणी ते पण तब्बल दोन तास फक्त कलर्स मराठीवर.

या विशेष भागामध्ये अनिरुध्द जोशी, श्रीरंग भावे, वैशाली माडे, मधुर कुंभार, निहिरा, शरयू यांची सुमधूर ऐकायला मिळणार आहेत. ज्यामध्ये भारुड, जागर, पोवाडा, पार्वतीच्या बाळा, कोळी गीत, ललाटी भंडार अशी अनेक गाणी ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या विशेष भागासाठी तेजश्री प्रधान खास जरीची साडी, गजरा, नथ अशा लूकमध्ये तर पुष्कराजदेखील फेटा, धोतर आणि कुर्ता अशा मराठमोळ्या पोशाखात दिसणार आहेत. दोघेही या या पारंपरिक वेशभुषेत खूपच सुंदर दिसत आहेत. यावेळी सेटवर गुढीदेखील उभारली गेली.
तेव्हा पाहायला विसरू नका ‘सूर नवा ध्यास नवा’ गुढीपाडवा विशेष भाग १८ मार्च रात्री ८ वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.