News Flash

विनोदी अभिनेता भूषण कडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीचा करोनामुळे मृत्यू

उपचारादरम्यान आज सकाळी कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला

विनोदी अभिनेता भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करोनामुळे भूषणच्या पत्नीचं निधन झालंय. काही दिवसांपूर्वीच भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना करोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान  कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ३९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू आणि भूषण कडू दोघांनाही करोनाची लागण झाली होती. भूषणची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर कांदबरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. दूर्दैवाने २९ मेला  कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. भूषण आणि कादंबरी यांना प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे. भूषण आणि त्याच्या संपूर्ण कुंटबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

भूषणत्या पत्नीच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे.

बिग बॉसच्या पहिल्या पर्वात कादंबरीची झलक

कांदबरी ही भूषणची दुसरी पत्नी होती. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात अभिनेता भूषण कडू सहभागी झाला होता. यावेळी त्याची पत्नी कादंबरी आणि मुलगा भूषणच्या भेटीला आले होते. यावेळी बऱ्याद दिवसांनी आपल्या मुलाला पाहून भुषणच्या अश्रुंचा बांध फुटला होता. हा एपिसोड पाहून चाहते देखील भावूक झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhushan Kadu (@bhushankaduofficial)

विनोदवीर भूषणच्या कुटुंबावर शोककळा
अभिनेता भूषण कडूने आजवर त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ यासोबतच ‘कॉमेडीती बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अशा शोसोबतच भुषणने अनेक सिनेमांमधुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मस्त चाललंय आमचं, , श्यामची मम्मी, भुताची शाळा, टारगेट अशा विविध कालकृतींमधून भूषणने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. मात्र आज भूषणच्या संपूर्ण कुटुंबावर त्याच्या पत्नीच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडपासून मराठी सिनेसृष्टी आणि कलाक्षेत्रात अनेकांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 9:53 am

Web Title: comedy actor bhushan kadu wife kadambari passed away due to corona kpw 89
Next Stories
1 अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या नावावर करणी सेनेचा आक्षेप, सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी
2 लग्नकल्लोळ!
3 सोनी मराठीवर ‘गाथा नवनाथांची’
Just Now!
X