News Flash

कॉमेडी क्वीन भारती सिंहला तिची दुरावलेली लेक सापडली; म्हणाली ‘या’ कारणासाठी ठेवलं होतं दूर

सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

कॉमेडी क्वीन भारती सिंहने आजवर तिच्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. भारतीसोबतच तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील चांगली क़ॉमेडी करतो. सध्या या दोघांची जोडी ‘डान्स दीवाने-३’ हा शो होस्ट करत असून स्पर्धक, जजेस आणि प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहेत. शो होस्ट करत असतानाच भारती आणि हर्षची मस्ती पाहायला मिळते.

भारती आणि हर्ष ऑनस्क्रीन जितकी धमाल करतात तितकीच धमाल त्यांची पडद्यामागे देखील सुरू असते. पडद्या मागे धमाल करताना त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातच आता भारतीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यात ती एका मुलीला ती त्यांची मुलगी असल्याचं सांगतं आहे. या व्हिडीओत भारतीने ही मुलगी त्यांची असून तिला का दूर ठेवलं हे देखील सांगितलंय.

भारतीचा पती हर्षने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ‘डान्स दीवाने-३’ च्या सेटवरचा हा व्हिडीओ आहे. शूटिंग थांबलेलं असताना या शोमधील स्पर्धक गुंजन व्यायाम करताना दिसतेय. यात हर्ष गुंजनला ती काय करत असल्याचं विचारतोय. यावर गुंजन ती स्ट्रेचिंग करत असल्याचं सांगते. त्यानंतर हर्ष भारतीला “गुंजनला सत्य काय आहे ते सांग” असं म्हणतो. यावर भारती म्हणते, “गुंजन आमची मुलगी आहे. जेव्हा आमच्या करिअरला सुरूवात झाली तेव्हा हिचा जन्म झाला त्यामुळे मग आम्ही हिला तिच्या मम्मीला देऊन टाकलं.” असं भारती म्हणतेय. हा धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

 

यात पुढे भारती म्हणते, “आम्हाला करिअरवर लक्ष द्यायचं होतं म्हणून आम्ही हिला देऊन टाकलं. आमचं करिअर तर बनलं नाही तर आता आम्ही विचार करतोय आपल्या मुलीला परत घ्यावं.” असं म्हणत भारती गुंजनला मिठी मारताना दिसतेय. भारतीचा हा कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतेय. अनेक जण तिच्या विनोदी बुद्धीचं कौतुक करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच भारतीच्या ‘डान्स दीवाने-३’ या  शोमधील एक भावूक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका स्पर्धाकाचा डान्स परफॉर्मन्स पाहून भारती भावूक झाली होती. यात सध्याच्या करोनाच्या स्थितीमुळे आम्हाला बाळाचा विचार करण्याचं धाडस होत नसल्याचं ती म्हणाली होती. यावेळी भारतीला अश्रू आवरणं कठीण झालं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 5:07 pm

Web Title: comedy queen bharthi singh funny video viral said found my daughter gunjan on dance deewane set kpw 89
Next Stories
1 ‘खूप विचित्र होतं..’,अनुराग कश्यपची लेक आलियाने सांगितला पहिल्या किसचा किस्सा
2 अंडरवर्ल्डचा ‘तो’ कॉल ठरला संजय दत्त आणि गोविंदाच्या मैत्रीला तडा जाण्याचे कारण
3 सैफ अली खानचा ‘भूत पोलीस’ प्रदर्शित होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर
Just Now!
X