असे म्हणतात की ‘Growing old is mandatory but growing up is not’ म्हणजे ‘वृद्ध होणं अटळ आहे, पण बालपण सोडणं अटळ नाही’. तुम्ही वयाने मोठे होता, पण तुम्ही तुमचं बालपण जपू शकता. तुमच्यातली कला जोपासू शकता. हे या आजींकडे बघून कळते. सध्या सोशल मीडियावर एका आजींचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या आजींच वय ६३ वर्ष असून त्या इतका उत्तम डान्स करतात की जे भल्या-भल्यानां जमणार नाही.

या आजींच नाव ‘रवी बाला शर्मा’ आहे. या आजी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असून आपले डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात.  त्यांनी नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या आजींनी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणच्या या गाण्यावर या आजींचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओत आजींनी काळ्या रंगाचा स्कर्ट व प्रिंटेड ओढणी परिधान केलं आहे.

त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “अप्रतिम व्हिडीओ आहे अगदी परफेक्ट हावभाव आहेत.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “मनमोहक अदा आणि उत्तम हावभाव.”

या आजी गेल्या २७ वर्षांपासून एक सरकारी शाळेत म्युझिक टीचर कार्यरत होत्या. त्या एक प्रशिक्षित कथ्थक डान्सर देखील आहेत. या आजींनी गेल्यावर्षी सोशल मीडियावर आपले अकाऊंट बनवले असून त्यांचे हे व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

दरम्यान, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण बरोबरच रणवीर सिंग,प्रियांका चोप्रा पण मुख्या भूमिकेत आहेत.