फोटो आयडीमध्ये चुकीचा फोटो लावल्यामुळे घोटाळा किंवा गोंधळ उडाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मात्र, आता असाच एक प्रकार चक्क अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत घडला आहे. मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांच्या यादीमध्ये (मनरेगा) तिच्या फोटोचा समावेश असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत अन्य दहा जणांच्या कार्डवर चुकीचा फोटो असल्याचं डीएनएच्या वृत्तात म्हटलं आहे.

मध्य प्रदेशातील झिरनिया पंचायतीमधील एका गावात मनरेगा जॉब कार्डवर चक्क दीपिका पदुकोणचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच या बनावट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांचे दावे करण्यात आल्याचं जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

( फोटो सौजन्य : डीएनए)

तलाव आणि कॅनॉल बनविण्यासाठी ३० हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. शांतीलाल आणि अन्य लोकांची नावे यावर आहेत; पण त्यांना याबाबत काहीच माहीत नाही. यात नाव असलेले दुबे म्हणतात की, एक दिवसही असे काम केलेले नाही. दरम्यान, खरगोन जिल्ह्यातील नाका या गावातील सोनू शांतिलाल नामक व्यक्तीच्या कार्डवर दीपिका पदुकोणचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच शांतिलाल यांनी नाला करण्यासाठी मनरेगाकडून पैसे घेतल्याचं सांगण्यात येत आहे.