News Flash

दीपिकासह विन डिझेलने घेतला मुंबईच्या ‘कटिंग चाय’चा स्वाद

‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

छाया सौजन्य- फेसबुक

गेल्या काही काळापासून बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण तिच्या ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र  होती. तिचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा असल्यामुळे, या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी ती भलत्याच उत्साहातही दिसत होती. १४ जानेवारीला ‘ट्रिपल एक्स’ चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. भारतात या चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी खुद्द हॉलिवूड स्टार विन डिझेल आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक डी. जे. कॅरुसोही भारतात आले होते.

अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि विन डिझेल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने अभिनेता विन डिझेल भारतात आला होता. त्यावेळी सोशल मीडिया आणि चित्रपट वर्तुळावर याविषयीच्याच चर्चांना उधाण आले होते. यावेळी दीपिकाने मोठ्या उत्साहात विनसोबत तिच्या या पहिल्या हॉलिवूडपटाचे प्रमोशन केले. चाहत्यांच्या उदंड प्रतिसादाचा आणि प्रेमाचा अनुभव घेतल्यानंतर विन डिझेल मायदेशी परतला आहे. पण, भारतातून बऱ्याच आठवणींचा ठेवा त्याने आपल्यासोबत नेला आहे. भारतात असताना विनच्या पाहुणचारामध्ये दीपिकाने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.

पाहा: VIDEO: …आणि मला दीपिकाचा ‘बॉयफ्रेंड’ भेटला

मुलाखतींपासून ते अगदी पत्रकार परिषद आणि बॉलिवूड सेलिब्रिटींशी भेटीगाठींपर्यंतची सुरळीत आखणी करत विनसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय पाहुणचाराचा आनंद घेत विन डिझेलनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिका आणि विन एकमेकांसोबत मुंबईच्या प्रसिद्ध ‘कटिंग चाय’चा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. विनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्याच्या या फोटोला जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे. विनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर त्याचा आणि दीपिकाचा फोटो शेअर केला. फेसबुकवर विन डिझेलने भारतीयांच्या पाहुणचाराचे कौतुक केले आहे. विन आणि दीपिकाचा हा फोटो पाहिला तर हॉलिवूडचा हा अभिनेता भारतातही चांगलाच रुळला होता असेच म्हणावे लागेल. दरम्यान, फक्त मुंबईतच नव्हे तर विविध ठिकाण दीपिका आणि विन डिझेल यांनी एकत्रितपणे ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाचे प्रमोशन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 3:20 pm

Web Title: deepika padukone vin diesel enjoy mumbai cutting chai xxx return of the xander cage
Next Stories
1 २२ वर्षांनंतर सुरु होतेय चंद्रकांता मालिका; या अभिनेत्रीचा दिसणार बोल्ड लूक
2 VIDEO: तरुणीची छेड काढणाऱ्या इसमाला आतिफ अस्लमने खडसावले
3 सनी म्हणतेय, ‘कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता’
Just Now!
X