News Flash

श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे यांच्यात खुलणार प्रेम

नेमकं काय आहे प्रकरण?

छोट्या पडद्यावर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिकांची निर्मिती करण्यात आली. या कौटुंबिक मालिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. परंतु बदलत्या काळानुसार मालिकांचे विषयदेखील बदलताना दिसत आहेत. झी युवा वाहिनीवरील ‘फुलपाखरू’, ‘फ्रेशर्स’, ‘लव लग्न लोचा’, ‘बन मस्का’ किंवा ‘युवा सिंगर’ या मालिकांमधून अनेक नवनवीन विषय हाताळण्यात आले. त्यानंतर आता असाच एक नवा विषय डॉक्टर डॉन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेमध्ये अभिनेता देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

‘जय मल्हार’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला देवदत्त नागे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दिसून आला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा त्याचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळविला आहे. डॉक्टर डीन या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला. यामध्ये देवदत्त आणि श्वेता अत्यंत मजेशीर अंदाजात दिसून येत आहेत.


देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. हा प्रोमो अतिशय मजेशीर असून यात श्वेता शिंदे या एका हॉस्पिटलच्या डीनचा रोल साकारत आहेत. तर देवदत्त नागे ‘देवा’ ही भूमिका साकारत आहे.

वाचा : करिनासोबत फ्लर्ट करणाऱ्या कपिलला सैफने झापलं; म्हणाला…

देवदत्त साकारत असलेली ही भूमिका त्याने आजवर केलेल्या सर्वच भूमिकांपेक्षा वेगळी आहे. त्यात दोघेही उत्तम कलाकार त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. डॉक्टर डॉन आणि डार्लिंग डीन यांची रोमँटिक केमिस्ट्री १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:01 pm

Web Title: devdutt nage and shweta shinde team up for an upcoming marathi tv show doctor den ssj 93
Next Stories
1 करिनासोबत फ्लर्ट करणाऱ्या कपिलला सैफने झापलं; म्हणाला…
2 Video : रणवीरने सहअभिनेत्याला केलं किस
3 प्रिती झिंटाने सोडलं ६०० कोटी रुपयांच्या संपत्तीवर पाणी?
Just Now!
X