News Flash

दिया मिर्झाने साजरा केला सावत्र मुलीचा वाढदिवस, व्हिडीओ व्हायरल

सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी वैभव रेखीशी लग्न केले. त्यानंतर दिया वैभव रेखी आणि सावत्र मुलगी समायरासोबत मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेत होती. आता दियाने समायराचा वाढदिवस साजरा केला असल्याचे समोर आले आहे. वाढदिवस साजरा करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वैभव रेखीची पहिली पत्नी सुनैनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीचा वाढदिवस साजरा करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘कुटुंब’ असे कॅप्शन सुनैनाने दिले आहे. तसेच या पोस्टमध्ये दिया मिर्झा, वैभव रेखी यांना टॅग केला आहे.

समायराचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तिचे काही मित्रमैत्रीणी वाढदिवस साजरा करण्यासाठी आले असल्याचे दिसत आहे. तसेच समायराचे वडील वैभव तिच्यासोबत असल्याचे दिसत आहे. केक कापताना दिया समोर उभी असल्याचे दिसत आहे.

वैभवचे हे दुसरे लग्न आहे. त्याची पहिली पत्नी सुनैना ही योगा आणि लाइफस्टाइल कोच आहे. तिने वैभव आणि दियाला लग्नानंतर शुभेच्छा दिल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 2:55 pm

Web Title: dia mirza joined hubby vaibhav rekhi and his ex wife sunaina rekhi avb 95
Next Stories
1 अर्जुनचं ‘फरक ओळखा’ चॅलेंज जान्हवीने जिंकलं!
2 “ही तर फक्त सुरुवात आहे”, कंगनाचा उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यावर निशाणा
3 “आता लसीकरण सरसकट सगळ्यांसाठी सुरू व्हायला हवं”, सोनाली कुलकर्णीची विनंती
Just Now!
X