News Flash

बिग बॉसच्या घरात राहुलने केलं प्रेयसीला प्रपोज, दिशा परमार म्हणाली…

जाणून घ्या तिने काय उत्तर दिले आहे..

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १४पर्व सध्या चर्चेत आहे. शो मधील स्पर्धक प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. दरम्यान राहुल वैद्यने शोमध्येच प्रेयसीला थेट लग्नासाठी विचारले होते. आता तिने यावर उत्तर दिले आहे.

राहुल गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दिशा परमारला डेट करत आहे. आता राहुलने बिग बॉसच्या घरातून प्रेयसीला लग्नासाठी विचारल्यानंतर तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याचे उत्तर दिले आहे. तिने ट्विटरवर ‘मी माझे उत्तर दिले आहे’ असे ट्विट करत म्हटले आहे. पण दिशाने राहुलला हो म्हटले आहे की नाही याचा खुलासा केलेला नाही.

दिशाच्या या ट्विटर अनेकांनी रिट्विट करत अनेक प्रश्न विचारले आहेत. तिने राहुलला काय उत्तर दिले हे अद्याप कळालेले नाही. काही दिवसांपूर्वी राहूलची आई गीता वैद्य यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी अतिशय आनंदी असल्याचे म्हटले होते.

कोण आहे राहुलची गर्लफ्रेंड?

दिशा परमार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’,’वो अपनासा’ या कार्यक्रमात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेत तिने पंखुडी ही व्यक्तीरेखा साकारली होती. विशेष म्हणजे तिची ही भूमिका विशेष गाजली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 4:51 pm

Web Title: disha parmar rahul vaidya girlfriend replied on proposal avb 95
Next Stories
1 उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर शेअर केला मोबाईल नंबर, पण…
2 ‘यंदा किल्ल्यांपेक्षा हॅलोविनचेच फोटो जास्त’; देवदत्त नागेने व्यक्त केली खंत
3 नागार्जुनची सून समंथा अक्किनेनी घेते मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल
Just Now!
X