News Flash

दिशाच्या ड्रेसवर टायगरच्या बहिणीची भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाली…

कृष्णा श्रॉफ दिशाच्या ड्रेसवर म्हणाली....

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी दिशा तिच्या लाल रंगाच्या ड्रेसमुळे चर्चेत आहे. अलिकडेच तिचा ‘मलंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित केलेल्या खास पार्टीत ती लाल कपड्यांमध्ये अवतरली होती. तिने घातलेला पोशाख पाहून सर्वांची नजर तिच्यावरच खिळली होती. या ड्रेसवर अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाच्या ड्रेसवर काय म्हणाली टायगरची बहिण?

दिशाने या रेड ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोवर कृष्णा म्हणाली, “मी देखील असाच एक ड्रेस ऑर्डर केला आहे. मात्र अद्याप तो आलेला नाही. तू कुठल्या साईजचा ड्रेस घेतलास?”

कृष्णा देखील दिशा प्रमाणेच आपले फाटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने अद्याप चित्रपटांमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे देखील सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिने शेअर केलेला प्रत्येक फोटो तुफान व्हायरल होतो. या पार्श्वभूमीवर सध्या कृष्णाने दिशावर केलेली ही कॉमेंट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 2:06 pm

Web Title: disha patani sports maroon dress krishna shroff wants to know its size mppg 94
Next Stories
1 ..म्हणून ‘या’ मराठी अभिनेत्रीला डॉक्टरांनी दिलं ‘करोना’ औषध
2 Coronavirus : “जलसासमोर गर्दी करु नका”; बिग बींचे चाहत्यांना आवाहन
3 ‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्यानंतर नेहा धुपिया म्हणते..
Just Now!
X