News Flash

‘द रॉक’च्या दुसऱ्या लग्नात बायकोने घातला लाखोंचा गाऊन, जाणून घ्या किंमत

लॉरेनचा हा गाऊन फॅशन डिझायनर मीरा झ्विलिंगरने डिझाइन केला आहे

‘द रॉक’च्या दुसऱ्या लग्नात बायकोने घातला लाखोंचा गाऊन, जाणून घ्या किंमत

हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉकने नुकताच प्रेयसी लॉरेन हॅशनसोबत लग्न केले. हा लग्नसोहळा १८ ऑगस्टरोजी एका समुद्र किनाऱ्यावर आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणीं आमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या लग्नाचे काही फोटो ड्वेनने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ड्वेनने पांढऱ्या रंगाची ट्राउजर आणि पांढरा शर्ट परिधान केला आहे. तर लॉरेनने ड्वेनला मॅचिंग पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला आहे. या गाऊनची किंमत ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल.

लग्नासाठी लॉरेनने हॉलिवूडमधील फॅशन डिझायनर मीरा झ्विलिंगरकडून गाऊन डिझाइन करुन घेतला होता. या गाऊनवर सुंदर असे एम्ब्रोडरी काम करण्यात आले आहे. या गाऊनची किंमत १२,०५० डॉलर म्हणजेच तब्बल ८,६२,४०० रुपये आहे. लॉरेनचा हा गाऊन मीराच्या अधिकृत वेबसाईटवरुन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 

View this post on Instagram

 

We do. August 18th, 2019. Hawaii. Pōmaikaʻi (blessed) @laurenhashianofficial @hhgarcia41

A post shared by therock (@therock) on

दरम्यान, ड्वेनने १९९७ साली आपल्या कॉलेजच्या मैत्रिणीसोबत म्हणजेच डॅनीसोबत लग्न केले होते. मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे या दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. त्यानंतर ड्वेन लॉरेनला डेट करत होता. WWE मधून संन्सास घेतल्यानंतर ड्वेनने ‘द स्कॉर्पियन किंग’, ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’सह अनेक सुपरहिट वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 1:03 pm

Web Title: dwayne johnson wife lauren hashia wedding gown price avb 95
Next Stories
1 ‘नेटफ्लिक्स’साठी प्रियांका चोप्रा होणार सुपरहिरो
2 …म्हणून दीपिकाने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय
3 इंदिरा गांधी यांच्यावर वेब सीरिज, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका
Just Now!
X