महाराष्ट्रातील लोककलांच्या भरजरी परंपरेला पुन्हा झळाळी देण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी ‘एकदम कडक’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील लोककलाकार आपली कला सादर करत आहेत. त्यांच्या जोडीला प्रसिद्ध विनोदवीर आपल्या खुमासदार विनोदांच्या मेजवानीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. त्यामुळे शास्त्रीय गायन, भजन, धम्माल स्कीट अशी मनोरंजनाची पर्वणी ‘एकदम कडक’ या कार्यक्रमाच्या पुढील आठवड्यामधील भागांमध्ये बघायला मिळणार आहे.

एकदम कडकच्या येत्या आठवड्यामधील भागामध्ये ‘ढोलकी – घुंगरू, काव्य आणि कव्वाली’ यामध्ये सामना रंगणार आहे. त्यासोबतच प्रेक्षकांना काही खास परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या भागात कथ्थक नृत्यांगना शर्वरी जेमिनीस यांचं अप्रतिम कथ्थकनृत्य आणि आनंद शिंदे यांनी कव्वाली पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, आनंद भाटे आणि रघुनंदन पणशीकर यांनी अत्यंत सुंदर शास्त्रीय गायन सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. किर्ती किल्लेदार आणि विश्वजित ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ हे गाणं सादर करणार आहे. ‘ढोलकीच्या तालावर’ तिसऱ्या पर्वाची विजेती मीनाक्षी पोशे आणि याच कार्यक्रमाची फाइनलिस्ट धनश्री ढोमसे या दोघी बहारदार लावणी सादर करणार असून सुजाता कुंभार आणि प्राजक्ता या दोघींनी त्यांच्या लावणीतला ठसकेबाजपणा दाखविणार आहेत. या परफॉर्मन्स बरोबरच धमाकेदार स्कीट देखील सादर झाले. तेव्हा नक्की बघा ‘एकदम कडक’ सोम ते बुध रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.